आमूलाग्र शब्दाचा वाक्यात उपयोग करा in Marathi
Answers
Answered by
19
Answer:
चेतनच्या अभ्यासाच्या सवयीत आमूलाग्र बदल झाला
Hope it helps you
Answered by
1
अमुलाग्र या शब्दाचा अर्थ- खूप मोठ्या प्रमाणात किंवा लक्षात येईल असा.
आमूलाग्र या शब्दाचा वाक्यात उपयोग खालील प्रमाणे-
- सतत अभ्यास केल्याने विजयच्या परीक्षेच्या निकालामध्ये आमूलाग्र बदल झाला.
- आईवडिलांनी सतत मुलांचे कान टोचल्यामुळे त्यांच्या वागण्यामध्ये आमूलाग्र असे बदल दिसले.
- प्रेक्षकांच्या सततच्या तक्रारीनंतर सिनेमागृहाच्या मालकाने सिनेमागृहात आमूलाग्र असे बदल केले.
- विद्यार्थ्यांच्या पाठपुराव्यानंतर शाळेत घेण्यात येणार्या प्रवेशाच्या प्रक्रियेमध्ये आमूलाग्र असे बदल करण्यात आले.
- मागच्या काही वर्षापासून शिक्षण पद्धतीमध्ये आणि प्रत्येक शाखेच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र असे बदल करण्यात आले.
- गावामध्ये नवीन व्यक्ती सरपंच झाल्यामुळे व त्याच्या आधुनिक विचारसरणीमुळे गावाच्या विकासात आमूलाग्र असे बदल दिसून येतात.
- गावातील सर्व तरुण मंडळी एकत्र आल्यामुळे व राजकारण्यांनी त्यांना साथ दिल्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत आमूलाग्र बदल घडून आले.
वाक्यात उपयोग कसा करावा याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
https://brainly.in/question/40111632
https://brainly.in/question/18230380
#SPJ2
Similar questions