Geography, asked by gajananmasram0103, 16 hours ago

• आम्ल पर्जण्यामुळे नुकसान होते.​

Answers

Answered by py5024131
0

Answer:

आधुनिक काळातील एक पर्यावरणीय समस्या. कोरड्या किंवा शुष्क स्वरूपातील आम्लकणांचे वातावरणातून भूपृष्ठावर होणारे निक्षेपण. सर्वसामान्यपणे आम्लपर्जन्य (अ‍ॅसिड रेन) म्हणून ओळखले जाते.

अ‍ॅसिड प्रेसिपिटेशन ही संज्ञा १८७२ मध्ये रॉबर्ट अँगस स्मिथ यांनी आपल्या ‘एअर अ‍ँड रेन’ या ग्रंथात प्रथम वापरली. १९८४ पासून मँचेस्टर हे आम्लपर्जन्याचे सूचना व मार्गदर्शक केंद्र बनले आहे. जीवाश्म इंधनांचे ज्वलन, प्रगलन क्रिया, औष्णिक विद्युत् केंद्रे, औद्योगिक बाष्पपात्र (बॉयलर), धातू उद्योग, मोटारगाड्या, कारखाने, घरातील अग्नी इ. मानवी प्राक्रियांमधून, तसेच ज्वालामुखी क्रिया, विघटन क्रिया, दलदली, वणवे, समुद्रातील प्लवंग इ. नैसर्गिक प्रक्रियांमधून विविध वायुरूप प्रदूषके व ऑक्साइडे वातावरणात उत्सर्जित होतात. वातावरणात मिसळलेल्या सल्फर डायऑक्साइड, सल्फर ट्राय-ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, कार्बन डाय-ऑक्साइड, क्लोरीन या वायुरूप प्रदूषकांचा वातावरणातील ऑक्सिजन व बाष्पाशी संयोग होऊन सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक व नायट्रस आम्ले, कार्बनिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ले इ. तयार होतात. ही आम्ले वृष्टिजलात विरघळून ती जमिनीवर येतात. अशा वर्षणास आम्लवर्षण म्हणतात.

रासायनिक गुणधर्मानुसार आम्लवर्षणाचे वेगवेगळे प्रकार पडतात. उदा., सल्फ्युरिक आम्लवर्षण, नायट्रिक आम्लवर्षण, कार्बनिक आम्लवर्षण. वृष्टिजलात काही प्रमाणात आम्ल असेतच; कारण वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड हा वायू काही प्रमाणात मिसळलेला असतो. कार्बनिक आम्ल हे वर्षणातून जमिनीवर येते, मात्र त्याचे सामू (पीएच् मूल्य) ५.६ असल्याने ते हानीकारक ठरत नाही; या आम्लाचे प्रमाण वाढल्यास असे वर्षण घातक ठरते. आम्लवर्षण हा हवेच्या प्रदूषणाचा परिणाम असून दिवसेंदिवस ही एक गंभीर समस्या बनत आहे. विशेषत: विकसित देशांत ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, विविध वस्तू, वास्तुशिल्प आणि मानवी आरोग्य यांवर दुष्परिणाम होतात.

आम्लवर्षणामुळे वनस्पतींच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेवर (हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेवर) परिणाम होऊन पानांचा हिरवेपणा कमी होतो. त्यामुळे पाने पिवळी पडून हळूहळू गळून पडतात. कालांतराने त्या वनस्पती नष्ट होतात. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, यूरोपीय देश, जपान इ. देशांत आम्लवर्षणामुळे कित्येक वनस्पती वेगाने नष्ट होत आहेत. जपानमधील टोकिओच्या उत्तरेस असलेल्या कांटो मैदानी प्रदेशाच्या विस्तृत क्षेत्रातील सीडार वृक्ष आम्लवर्षणामुळे पूर्णत: नष्ट झालेले आहेत.

आम्लवर्षणाचे जलपरिसंस्थेवर दुष्परिणाम होतात. आम्लयुक्त पाण्यात प्लवंगांची वाढ खुंटते, माशांची पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंद पडते व मासे मरतात. आम्लवर्षणामुळे नद्या, ओढे, तळी, सरोवरे यातील पाणी दूषित होते. जमिनीचे आम्लीकरण होऊन तिचे रासायनिक गुणधर्म बदलतात. त्यामुळे जमिनीची प्रत खालावते व तिची सुपीकता कमी होते.

आम्लवर्षणाचे मानवी आरोग्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या परिणाम होतात. आम्लयुक्त पाणी पिण्याने श्वासनलिकेचे, मज्जासंस्थेचे, त्वचेचे व पोटाचे विकार विकार जडतात. वाढत्या प्रदूषणामुळे भारतात आम्लपर्जन्याचे प्रमाणही वाढत आहे. विशेषत: मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद इ. औद्योगिक शहरांमध्ये त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत.

ऑडिओ

Similar questions