१) आम्लपर्जन्याचे दुष्परिणाम कोणते?
Answers
Answer:
वातावरणात मिसळलेल्या सल्फर डायऑक्साइड, सल्फर ट्राय-ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, कार्बन डाय-ऑक्साइड, क्लोरीन या वायुरूप प्रदूषकांचा वातावरणातील ऑक्सिजन व बाष्पाशी संयोग होऊन सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक व नायट्रस आम्ले, कार्बनिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ले इ. तयार होतात. ही आम्ले वृष्टिजलात विरघळून ती जमिनीवर येतात. अशा वर्षणास आम्लवर्षण म्हणतात.
रासायनिक गुणधर्मानुसार आम्लवर्षणाचे वेगवेगळे प्रकार पडतात. उदा., सल्फ्युरिक आम्लवर्षण, नायट्रिक आम्लवर्षण, कार्बनिक आम्लवर्षण. वृष्टिजलात काही प्रमाणात आम्ल असेतच; कारण वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड हा वायू काही प्रमाणात मिसळलेला असतो. कार्बनिक आम्ल हे वर्षणातून जमिनीवर येते, मात्र त्याचे सामू (पीएच् मूल्य) ५.६ असल्याने ते हानीकारक ठरत नाही; या आम्लाचे प्रमाण वाढल्यास असे वर्षण घातक ठरते. आम्लवर्षण हा हवेच्या प्रदूषणाचा परिणाम असून दिवसेंदिवस ही एक गंभीर समस्या बनत आहे. विशेषत: विकसित देशांत ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, विविध वस्तू, वास्तुशिल्प आणि मानवी आरोग्य यांवर दुष्परिणाम होतात.
आम्लवर्षणामुळे वनस्पतींच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेवर (हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेवर) परिणाम होऊन पानांचा हिरवेपणा कमी होतो. त्यामुळे पाने पिवळी पडून हळूहळू गळून पडतात. कालांतराने त्या वनस्पती नष्ट होतात. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, यूरोपीय देश, जपान इ. देशांत आम्लवर्षणामुळे कित्येक वनस्पती वेगाने नष्ट होत आहेत. जपानमधील टोकिओच्या उत्तरेस असलेल्या कांटो मैदानी प्रदेशाच्या विस्तृत क्षेत्रातील सीडार वृक्ष आम्लवर्षणामुळे पूर्णत: नष्ट झालेले आहेत.