India Languages, asked by ali9783, 7 months ago

आमची सहल वर निबंध in Marathi plz give this answer fast

Answers

Answered by coolapoorva
2

Answer:

मी आजपर्यंत भरपूर प्रेक्षणीय स्थळं व निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला आहे. पण मागे वळून पाहता एका सहलीचा अनुभव मात्र अजूनही अंगावर काटा आणतो. एका ट्रॅव्हल कंपनीबरोबर आम्ही कोलकाता-दार्जिलिंगची सहल केली.

आम्ही कोलकात्त्याला उतरलो. भव्य हावडा ब्रीज पहात आमच्या हॉटेलवर पोहोचलो. दुपारी सिटी टूर केली. दुसरा दिवसही सिटी टूरचा होता. एक दिवस शॉपिंगसाठी वेळ दिला होता. शॉपिंगला निघतानाच आमच्या टूर लीडरने सूचना केलीअखेर त्या शांततेचा भंग आमच्या लीडरने केला. तो म्हणाला, 'इथून पुढचा प्रवास धोकादायक आहे. या प्रवासात आजूबाजूच्या जंगलातले डाकू प्रवाशांना लुटतात. म्हणून सर्व गाड्यांनी एकदम निघायचं आहे. पुढे एक पोलिस व्हॅन, मागे एक पोलिस व्हॅन व मध्ये सहा प्रवासी गाड्या. असा आमचा प्रवास सुरू झाला. भीतीने सर्वांनाच झोप येईना. रात्री १ ते ३ या वेळात सर्वच गाड्या खूप स्पीडने धावत होत्या. पण मध्येच ५ नंबरच्या गाडीत बिघाड झाला. चार गाड्या पुढे निघून गेल्या. गाडी थांबल्याबरोबर आजूबाजूच्या झाडाझुडपातून गाडीवर दगडफेक सुरू झाली. चित्रविचित्र आवाज येऊ लागले. सर्वांचीच भीतीने गाळण उडाली. पोलिसांनी हवेत गोळीबार करायला सुरुवात केली. गाडीच्या दरवाज्यावर डाकूंच्या धडका पडू लागल्या. आम्ही सर्वजण मुठीत जीव घेऊन बसलो होतो. बायका, मुलं रडू लागली. डाकूंनी गाड्या घेरल्यामुळे गाडीचे क्लिनर व ड्रायव्हर खाली उतरू शकत नव्हते. हवेतल्या गोळीबारामुळे मागे काहीतरी धोका आहे हे ओळखून पुढे असलेली पोलिस व्हॅन मागे आली. दुसरी व्हॅन मागे येताच डाकूंनी घाबरुन पलायन केलं आणि आमचा जीव भांड्यात पडला. डाकूंनी जर आमच्या गाडीत प्रवेश केला असता तर काय या कल्पनेनंच आमचा थरकाप उडाला होता. शेवटी प्रवास पुन्हा सुरू झाला. सकाळी आम्ही सिलिगुडीला पोहोचलो. तिथून पुढे दाजिर्लिंग. आम्ही २ दिवस सिटी टूर केली. पण सर्वांचं लक्ष रोप वे राईडवर होतं. आम्ही रोप वे राईडसाठी निघालो. पण आमच्या कमनशिबाने तिच्यात काहीतरी बिघाड झाला होता. त्यामुळे खालील पहाडी गावाच्या मस्त हवाई दर्शनाला आम्ही मुकलो. पण ही सहल म्हणजे आमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

- अंजली दाबके, गिरगांव की सर्वांनी दिवेलागणीपूर्वी हॉटेलवर परत यायचं आहे. तरीपण आमच्यापैकी एक महिला व तिच्या दोन मुली परत आल्या नाहीत. त्या दिवशी माकेर्ट भागात काहीतरी गडबड झाली व दुकानांची शटर्स भराभर बंद झाली. या तिघीजणी परत न आल्याने लीडर अस्वस्थ होता. आम्ही पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी बाजारातील साड्यांची दुकाने तपासून पाहिली. तेव्हा एका दुकानातून त्यांच्या रडण्याचा आवाज आला. पोलिसांनी मागून दुकानात प्रवेश केला. तेव्हा त्या तिघींना चक्क कोंडून ठेवण्यात आल्याचं कळलं. पण त्यांचं ऐकत नव्हते. केवळ नशीब जोरावर म्हणून पोलिसांच्या मदतीने त्यांची सुटका झाली. त्याच दिवशी रात्री आम्ही दार्जिलिंगकडे जाणार होतो. जेवणाचा कार्यक्रम मध्येच ११च्या सुमारास होता. प्रथम सिलिगुडीनंतर दाजिर्लिंग. सिलिगुडीहून निघाल्यापासून काही प्रवासी एकमेकांच्या कानात कुजबुजत होते. त्यामुळे वातावरणात तणाव होता. रात्री ११च्या सुमारास आम्ही एका हॉटेलमध्ये जेवलो. तेव्हा त्या स्पॉटवर काही प्रवासी गाड्या व प्रवासी पण होते. सारं काही शांत-शांत होतं.

Similar questions