aamche kanista mahavidyalay Marathi nibandh
Answers
Kanishta mahavidyaly has I knew it
■■ आमचे कनिष्ठ महाविद्यालय ■■
माझ्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव आहे 'पेंढारकर कॉलेज'. आमच्या महाविद्यालयाच्या तीन इमारती आहेत. प्रत्येक वर्ग मोठा व हवेशीर आहे.
महाविद्यालयाच्या भिंतींवर थोर व्यक्तींचे चित्र आहेत.तसेच माहितीचे फलकही आहेत.
आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे आवार फार सुंदर आहे.समोर एक मोठे मैदान आहे.तेथे आमच्या क्रीडा स्पर्धा होतात.बाजूलाच एक छोटी बाग आहे.महाविद्यालयाच्या भोवती मोठमोठी नारळाची झाडे आहेत.
आमच्या कनिष्ठ महाविद्यालयात एक मोठे ग्रंथालय तसेच विज्ञान,संगणक,केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांसाठी मोठमोठ्या प्रयोगशाळा आहेत.एक मोठे सभागृहही आहे.तेथे आमच्या सांस्कृतिक स्पर्धा व स्नेहसंमेलन होतात.
आमच्या महाविद्यालयाचे शिक्षक खूप चांगले शिकवतात.ते खूप प्रेमळ आहेत. ते आम्हाला उत्तेजन देतात.आम्ही रोज आनंदाने महाविद्यालयात जातो.
मी कधीही महाविद्यालयात सुट्टी घेत नाही.महाविद्यालयाला सुट्टी असली की मला कंटाळा येतो.
आमचे कनिष्ठ महाविद्यालय मला खूप आवडते.