आपले जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी असावे असे प्रत्येक माणसाला वाटत असते; पण तसे होत नाही.
उलट सर्वत्र पाहिले असता ‘दु:ख मणभर, सुख कणभर’ असाच अनुभव येतो; पण असे का होते? याचा विचार माणूस करत नाही. माणसाच्या जीवनात सर्व समस्या निर्माण होतात, त्याच्या मागे ‘अहंकार’ राक्षस असून तोच सर्व समस्यांना कारणीभूत असतो. हा अहंकार डोळ्यांना दिसत नाही. तो स्वत:जवळ आहे हे कळतही नाही, कारण तो सूक्ष्म स्वरूपातही असतो आणि स्थूल स्वरूपातही असतो. जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी अहंकार आहे तोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होणे कठीण व समाधान मिळणे त्याहूनही कठीण. माणसे अहंकाराचा फुगा कळत नकळत फुगवतच असतात. अज्ञानाला आलेला आकार म्हणजे अहंकार. या अहंकाराचा नाश झाल्याशिवाय माणसाला सत्याचा व सुखाचा साक्षात्कार होणे शक्य नाही, म्हणून माणसाला सुखी व समाधानी जीवन जगायचे असेल तर अहंकारावर लक्ष केंद्रित करून त्याला ताब्यात ठेवणे शिका.
२. अहंकाराला ताब्यात ठेवण्यासाठी तुमच्या मते कोणते गुण जोपासावेत व कोणते दोष दूर ठेवावेत, ते सविस्तर लिहा
Answers
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "इंग्लंडचा हिवाळा" या पाठातील आहे. या पाठाची लेखिका इरावती कर्वे आहेत. या पाठात इंग्लंडमधील हिवाळ्याचे आणि पावसाळ्यातील धुक्याचे वर्णन केले आहे.अतिशय चांगल्या शब्दात ऋतूंमधील साम्य आणि भेद रेखाटले आहेत.
★ अहंकाराला ताब्यात ठेवण्यासाठी पुढील गुण व दोष दूर ठेवावेत.
उत्तर- अहंकार ताब्यात ठेवण्यासाठी अहंकारावर एकाग्रता करून त्याला ताब्यात ठेवायला शिकले पाहिजे.अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच समस्या निर्माणच होणार नाहीत.कारण अहंपणा मी पणा मुळेच जास्त समस्या निर्माण होतात.
अहंकाराला जर मनात जागा दिली नाही तर माणसाचे जीवन सुखी समाधानी होईल.
तो आपल्यात असतो पण आपल्याला कळत नाही. जोपर्यंत तुम्हाला तुमच्यामध्ये अहंकार आहे हे कळत नाही, तोपर्यंत तो नकळतपणे वाढविला जातो.अज्ञानाला आलेला आकार म्हणजे अहंकार होय.
धन्यवाद...