Hindi, asked by waradevijay33, 7 months ago

*'आपले कुटुंब व आपण' यांची एकमेकां प्रति असलेली 'जबाबदारी, कर्तव्ये ,आपुलकी व जिव्हाळा आणि त्यांचे आपल्या आयुष्यात असलेले स्थान या विषयावर वर आपले विचार व्यक्त करा. ( किमान १०० वाक्यात)*
*(कुटुंब:- आजी,आजोबा,आई,वडील,काका,काकू,आत्या,मामा,मामी,भाऊ,बहीण तसेच इतर नातेवाईक)*

Answers

Answered by studay07
2

Answer:

         कुटुंब ,प्रतकाच्या आयुष्यात  खूप महत्वाचे स्थान असते. कुटुंब छोटे किंवा मोठे असू शकते.  भाऊ - बहीण , आई, बाबा , आजी , आणि आजोबा  हे काही कुटुंबाचे महत्वाचे घटक आहेत. यांच्या शिवाय कुटुंब अपूर्ण वाटते .

घरात वडील हे कुटुंबाचे पाया असतात. त्यांच्या वर खूप काही जबाबदाऱ्या असतात .     मुलांचे शिक्षण , घरातील काही कामे आणि  बाहेर हि काम या सारख्या जबाबदाऱ्या वडिलांवर असतात .

वडील जरी काही बोलून दाखवत नसले तरी त्यांच्या मनात हजारो विचार असतात जे आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवण्याचे असतात ,ते आपल्यासाठी खूप काही गोष्टींचा त्याग करत असतात परंतु आपल्याला त्या गोषीतींचा अंदाज नसतो, आपण कधी विचार हे करत नाहीत ,, आपण पण आपल्या जबाबदाऱ्या पार पडल्या पाहिजेत त्या मुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.  

आई ,सर्वांची काळजी घेणारी , सर्व सामान व्यवस्तीत ठेवणारी ,सर्वाना वेळेवर बाहेर पडण्यास मदत करणारी ,घर सांभाळणारी आईच असते , ती कधी तक्रार करत नाही, स्वतःच्या आवडी बद्दल हे काही जास्त बोलणार नाही परंतु सर्वांच्या आवडी मात्र तिला माहित असतात. आपण काही वेळा तिच्या वर रागवतो  पण ती राग मनात नाही. कोणाची आई शिकलेली असते कोणाची आई तेवढी शिकलेली नसती पण आई आई असते तिला सर्व गोष्टीचा अभ्यास असतो. आपण किती हि प्रयत्न केले तरी तिचे उपकार फहेदू नाही शकणार आई घराची शोभा असते .

आई आपल्याकडून जास्त अपेक्षा ठेवत नसते परंतु आपण विचार केला पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे कि तीच मन दुखवू नाही.  

कुटुंबात ज्या वेळा मुले असतात तेव्हा कुटुंब पूर्ण वाटते , लहान किंवा मोठे मुले असो आपण त्यांच्या पासून खूप काही शिकू शकतो .त्यांच्या मध्य जिज्ञासा असते नवीन करण्याची नवीन गोष्टी शिकण्याची , आपण त्यांच्या कडून अपेक्षा ठेऊ शकतो कि ते आपल्या कुटुंबाला आभिमान वाटेल  आश्या  काही गोष्टी करतील.  

कुटुंबात आजी आणि आजोबा पण महत्वाचे आहेत , आपण नेहमी नवीन गोष्टींच्या मागे असतो पण ज्या वेळी आपण आजी आणि आजोबा पाशी बसतो आपण त्याच्या कडून जुन्या आणि महत्वपूर्ण गोष्टी शिकू शकतो . आजी आणि आजोबा यांनी ज्या चुका केल्या त्या आपण सुधारू शकतो.  

आणि  बाकी सदस्य जसे काका ,काकू, मामा ,मामी , मावशी  हे सगळे पण महतवाचे आहेत काही कार्यक्रम असो किंवा काही संकटाची गोष्ट असो सर्व एकत्र आल्यावर मोठ्यातील मोठा प्रॉब्लेम पण छोटा वाटतो.                  

Similar questions