आपले राष्ट्रीय महापाप या पाठाचे लेखक का चे नाव
Answers
Answer:
mark me as brainliest please
Answer:
'आपले राष्ट्रीय महापाप' या पाठाचे लेखक स्वामी विवेकानंद आहेत.
Explanation:
आपले राष्ट्रीय महापाप या पाठाच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद आपले विचार जनतेसमोर मांडतात. ते म्हणतात सर्वसामान्य जनतेला फसवतो किंवा त्यांची उपेक्षा करतो त्याला ते महापाप मानतात. समाजात अनेक प्रकारच्या चुकीच्या रूढी-परंपरा,चाली-रिती असतात. ज्या चाली रितींमुळे आपापसात भेदभाव निर्माण होतो, ज्या अंधश्रद्धेमुळे मानवाची प्रगती खुंटते, ज्या शिक्षणाअभावी माणूस मागासलेला राहतो हे सर्व आपले राष्ट्रीय महापाप आहे असे ते मानतात. समाजामध्ये भेदभाव पसरल्यामुळे एका विशिष्ट गटाला वेगळी वागणूक, तर एका दुसऱ्या गटाला वेगळी वागणूक देऊन त्या दुसऱ्या गटाला उपेक्षित करण्याच्या भावनेला राष्ट्रीय महापाप मानतात. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मग तो कुठल्याही जातीचा,धर्माचा, पंथाचा,राष्ट्राचा असो, त्या प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सर्व अधिकार मिळाले पाहिजे व जर ते मिळत नसतील तर ते न मिळण्यासाठी जे जबाबदार असतील त्यांच्या कार्याला ते राष्ट्रीय महापाप मानतात.