History, asked by kadampoonam, 4 months ago

आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कोणती काळजी घेऊन व कशाप्रकारे केला पाहिजे​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय त्याचा आदर आपण केला पाहिजे. जबाबदार नागरिक म्हणून आपली नेमकी भूमिका काय असायला हवी याचा विचार सर्वांनी करावा. सध्या सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातात असल्यामुळे त्याचा गैरवापर जास्त होताना दिसतो. समोरच्याला कमी लेखून त्याची निंदा करणं, दु:ख देणं हे सर्रास होताना दिसतंय, जे अत्यंत चुकीचं आहे. तंत्रज्ञानाचा मोजका, पण योग्य वापर मी करतो. अनेक गरीब, नवोदित प्रतिभावान गायक - वादक कलाकारांना मी माझ्या सोशल मीडियामधून कला सादर करायला सांगतो. या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना त्याचा गैरवापर टाळा. लॉकडाउनमध्ये जो मोकळा वेळ मिळाला आहे, त्याचा सदुपयोग करावा. देशासाठी, भविष्यासाठी काय चांगलं करता येईल याच्यावर चर्चा या काळात होऊ शकते.

Similar questions