आपल्या मित्राला काळजी घेण्यास सांगणारे पत्र लिहा
Answers
Answer:
okkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk
Answer:
दिनांक -
प्रिय मित्र अक्षय,
कसा आहेस? तुझे पत्र मिळाले. वाचून आनंद झाला की तू दहावीच्या अभ्यासाच्या तयारीसाठी खूप मेहनत घेत आहेस. हे वर्ष खरच तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.
मित्रा, तुझ्या पत्रातून कळले की तू ऑनलाईन क्लासेस करत आहेस परंतु अभ्यासात काही अडचणी आल्या किंवा काही शंका असतील तर तुम्ही सर्व मित्र आठवड्यातून एकदा एकत्र भेटून त्या सोडविण्याचा प्रयत्न करता त्याचप्रमाणे शिक्षकांना ही मध्ये मध्ये भेटून न समजलेले अभ्यासक्रम समजून घेता ही खरंच चांगली गोष्ट आहे परंतु माझे तुला फक्त एवढेच सांगणे आहे की, सध्या जवळपास एक दीड वर्षांपासून संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आलेले आहे त्यामुळे आपल्या प्रत्येकालाच आपली काळजी घेणे अनिवार्य झाले आहे कारण जर आपण जास्त लोक एकत्र आलो अजाणतेपणी आपण स्वतःला व आपल्यामुळे आपल्या घरच्यांना ही हा गंभीर आजार देऊ शकतो.
तेव्हा एक मित्र म्हणून माझा तुला हाच सल्ला असेल की, हया काळात तू जेव्हा बाहेर जाशील तेव्हा स्वतःची नीट काळजी घे व मास्कचा वापर नक्की कर. जेणेकरून अभ्यासासाठी तुला जर घराबाहेर पडावे लागलेच तर तू या गंभीर आजारापासून सुरक्षित राहू शकशील.
मला खात्री आहे की तुला जो मी सल्ला वजा विनंती केलेली आहे ते तू नेहमी लक्षात ठेवशील. तुझ्या आईबाबांना माझा नमस्कार सांग. छोट्या राजूला अनेक आशीर्वाद. असेच मध्ये मध्ये पत्र पाठवून खुशाली सांगत राहा.
तुझा मित्र,
अभय.
ई-मेल - [email protected]