आपल्या परिसरातील पोलिस स्टेशनला भेट द्या व तेथील विशेष कामगिरी करणाऱ्या महिला पोलिसांची मुलाखत घ्या
Answers
Answer:
एखादा गुन्हा घडल्यावर तक्रार कशी नोंदविली जाते, पोलीस गस्त घालतात म्हणजे नेमके काय करतात, ‘बीट मार्शल’ म्हणजे काय आणि ते काय काम करतात.. अशा एकापाठोपाठ एक बालसुलभ प्रश्नांची सरबत्ती शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये झाली आणि त्यांचे निराकरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावे लागले. हा विषय केवळ प्रश्नांवर सुटला नाही, तर बच्चे कंपनीने पोलिसांकडून वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचीही स्वत: हाताळणी करून पाहिली. निमित्त होते, ‘रायझिंग डे’चे. पोलीस ठाणे व एकंदर पोलीस दलाविषयी सर्वसामान्यांच्या मनात असणारी अनामिक भीती दूर करून नागरिक व पोलीस यांच्यात सुसंवादाचा पूल बांधण्याचा प्रयत्न शहर पोलिसांनी सुरू केला आहे.
पोलीस यंत्रणेचे कामकाज, त्यांच्याविषयी असणारे गैरसमज दूर व्हावेत, जनमानसात या दलाची प्रतिमा उजळावी, नागरिक तसेच पोलीस यांच्यातील संवादाची दरी भरून निघावी, यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने ‘रायिझग डे’ साजरा केला जातो. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने यानिमित्त ८ जानेवारीपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिमंडल एक व दोनच्या परिक्षेत्रात ‘रायझिंग डे’चे औचित्य साधत अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे.