Political Science, asked by sampada22, 1 month ago

आपल्या परिसरातील स्थानिक शासनसंस्थांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांची मुलाखत घ्या.​

Answers

Answered by chhyaabhang99
2

Answer:

८-९-१० नोव्हेंबर २०१३ ला सावंतवाडी येथे होणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ४थ्या महिला साहित्य संमेलनात मेधा पाटकर यांची प्रकट मुलाखत हे श्रोत्यांसाठी प्रमुख आकर्षण असेल. मेधा पाटकर विलक्षण क्षमतेच्या समाजसेविका. ज्यांनी आपलं सुखासीन जगणं सोडून काटय़ाकुटय़ांचं आदिवासी जगणं स्वीकारलं. आदिवासी बांधवांना जगण्याचा हक्क व आनंद देण्यासाठी मोर्चे, संघर्षयात्रा, उपोषणे, आंदोलने आणि जलसमर्पण या मार्गाचा अवलंब करताना ज्यांना अटक, मारहाण, बदनामीला तोंड द्यावं लागलं, ‘नर्मदा बचाव’ चळवळीत ज्यांनी सरकार विरोधात गेली २५ वर्षे प्रदीर्घ लढा दिला, तसेच सरकारला भ्रष्टाचार, घोटाळे, अकार्यक्षमतेविषयी बेधडक जाब विचारला, त्यांचे अनुभव, त्यांच्या अफाट व्यक्तिमत्त्वाचे असंख्य पैलू उलगडतील. ‘अक्षर’च्या तडफदार संपादिका मुलाखतकार मीना कर्णिक या मुलाखतीतून अनेक सामाजिक प्रश्नांविषयीची मेधाताईंची प्रखर प्रामाणिक मते, तळमळ जाणून घेतील.

संमेलनातील आणखीन एक विशेष कार्यक्रम म्हणजे ‘टॉक शो’. स्वातंत्र्याच्या साठीनंतरही स्त्रियांवरचे वाढते अत्याचार, अलिकडील दिल्ली, मुंबईतील पाशवी सामूहिक बलात्काराची, हिंसाचाराची उदाहरणे पाहता स्त्रियांच्या सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच भेडसावू लागला आहे. म्हणूनच साहित्यिक मंथनाबरोबरच सामाजिक विचारमंथनाची गरज ओळखून स्त्रियांवरील बलात्कार, अ‍ॅसिड अ‍ॅटॅक, हिंसाचार फसवणूक वगैरे वगैरे. या विषयावर ‘टॉक शो’ ठेवल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाचं वैशिष्टय़ म्हणजे उपस्थित श्रोते या संदर्भातील आपल्या मनातील प्रश्न, शंका विचारू शकतील. विशेष भाष्य करण्यासाठी स्त्री चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां विद्या बाळ, नामवंत वकील रमा सरोदे, स्त्रीवादी साहित्यिक मंगला आठलेकर, स्त्रीसक्षमीकरण कार्यकर्त्यां स्नेहजा रूपवते व पोलीस अधिकारी सुवर्णा पत्की सहभागी असतील.

संमेलनात परिसंवाद व कवयित्री संमेलनातून नामवंत साहित्यिक नीरजा, मोनिका गजेंद्रगडकर, डॉ. नीला जोशी, उषा मेहता, अनुपमा उजगरे, अभिनेत्री संपदा जोगळेकर, झी-२४ तासच्या निर्मात्या मिताली मठकर, मालिका स्क्रीप्ट रायटर मनस्विनी, लता रवींद्र वगैरे मान्यवर सहभागी होणार आहेत. जिल्ह्य़ात प्रथमच होणाऱ्या या राज्यस्तरीय तीन दिवसीय महिला संमेलनाचा त्यातील विशेष कार्यक्रमांचा लाभ स्त्री-पुरुष जाणकारांनी जरूर घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष उषा परब व त्यांच्या आयोजक सहकारी किशोरी गव्हाणकर, डॉ. सोनल लेले, डॉ. कार्लेकर, भारती भाट, प्रा. सुभाष गोवेकर, नकुल पार्सेकर आदी उपस्थित होते.

Explanation:

Similar questions