आपल्या शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची
मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.
Marathi
Answers
Explanation:
प्त्रा लिहिणारा
पत्ता
दिनांक
प्रति,
माननीय व्यवस्थापक
पत्ता
विषय – पुस्तकांच्या मागणीबद्दल पत्र.
माननीय महोदय,
आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी आपल्याकडून काही पुस्तके मागविण्यासाठी हे पत्र पाठवीत आहे. सोबतच ७०० रुपयांची मनी ऑर्डर पाठवत आहे. उरलेली रक्कम नांतर पाठवू. पुस्तकांच्या किमतीवर योग्य ती सवलत देण्याची कृपा करावी.
पुस्तकांची यादी
पुस्तकाचे नाव लेखक प्रति
१. श्यामची आई साने गुरुजी १०
२. स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक २०
३. कलिका वि.स. खांडेकर १५
४. व्यक्ती आणि वल्ली पु.ल. देशपांडे १०
५. विशाखा कुसुमाग्रज १५
६. बटाट्याची चाळ पु.ल. देशपांडे २०
आपणास नम्र विनंती आहे की लवकरात लवकर पुस्तके पाठविण्याची कृपा करावी तसदीबद्दल क्षमस्व.
आपला कृपाभिलाषी
अ ब क