आपल्या विभागात अनियमित भारनियमन (load shedding) सुरु आहे. त्यामुळे अभियंता , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मुंबई विभाग यांच्याकडे तक्रार करणारे पत्र लिहा.
Answers
आपल्या विभागात अनियमित भारनियमन (load shedding) सुरु आहे. त्यामुळे अभियंता , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मुंबई विभाग यांच्याकडे तक्रार करणारे पत्र:
वासुदेव स्वामी
मु.पो. वानवडी,
मुंबई
विषय – अनियमित वीजपुरवठ्याबाबत तक्रार पत्र.
माननीय महोदय,
मी वानवडी गावात राहणार एक नागरिक आहे. सतत १५ दिवसांपासून आमच्या गावात अनियमित वीजपुरवठा होत आहे. दररोज वीज जाते. त्यामुळे रात्री खूप समस्या निर्माण होतात. विद्यार्थी अभ्यास करू शकत नाहीत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हैराण झाले आहेत.
सरकारी कार्यालय, बँकेतील संगणकीय व्यवहार ठप्प आहेत. दवाखाने, रुग्णालयातील आजारी व्यक्तींना खूप त्रास होत आहे. गिरण्या व कारखाने हे विजेवर अवलंबून असतात तेही १५ दिवसांपासून बंद आहेत. आम्हा सर्व सामान्य गावकऱ्यांचे खूप हाल होत आहेत.
तरी आपणास नम्र विनंती आहे की परिस्थितीची पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी.
तसदीबद्दल क्षमस्व.
आपला विश्वासू,
वासुदेव स्वामी
पत्र लेखन
Explanation:
प्रीती कुमार,
राधे विला,
सेक्टर-३,
मुंबई.
दिनांक: २५ ऑक्टोबर, २०२१
प्रति,
माननीय मुख्य अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित,
मुंबई.
विषय: अनियमित भरनियमनाबद्दल तक्रार करण्याबाबत.
महोदय,
स. न. वि.वि.
मी,प्रीती कुमार, विट्ठलवाडी विभागातील सगळ्या रहिवाशांच्या वतीने हे पत्र लिहत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून आमच्या विभागात अनियमित भारनियमन सुरु आहे, ज्यामुळे आम्हा सगळ्यांना खूप समस्या होत आहेत.
अनियमित भारनियमनामुळे मुलांना नीट अभ्यास करता येत नाही, ऑफिसच्या कामांमध्ये अडथळा येतात, घरातील महत्वपूर्ण कामे रखडतात. याशिवाय भरनियमनाची वेळ निश्चित नसल्यामुळे आमची खूप गैरसोय होते.
मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही योग्य योजना करून आमच्या विभागात वीजपुरवठा सुरळीत करावा व आमच्या समस्या दूर कराव्या.
तसदीबद्दल क्षमस्व.
आपली विश्वासु,
प्रीती कुमार.