आपल्या व्यक्तिमत्त्वाचे आणि समाजाचे विकसन
होण्यासाठी लिखकाने सांगितलले विचार
Answers
Answered by
2
Answer:
आपले दिसणे, चालणे, बोलणे म्हणजे नजरेला दिसणाऱ्या गोष्टी म्हणजेच आपले व्यक्तिमत्व समजण्याची चूक आपण करतो. व्यक्तिमत्वात अजून बऱ्याच गोष्टी येतात जसे की आपण विचार कसा आणि काय करतो, आपण संकटांचा सामना कसा करतो, आपल्यात कोणत्या चांगल्या आणि कोणत्या वाईट सवयी आहेत, वाईट किंवा नकारात्मक विचारांपासून आपण आपले मन कसे वळवतो, इत्यादी.
हल्ली बऱ्याच ठिकाणी व्यक्तिमत्व विकासाची शिबिरे घेतली जातात. आणि शाळांना सुट्टी लागली की पालक सुद्धा आपल्या मुलांना अशा शिबिरांत भरती करतात.
इथे चालणे, बोलणे, उभे राहणे असल्या गोष्टींवर काम केले जाते. या शिबिरांमध्ये व्यक्तिमत्व विकसित तर होते पण व्यक्तिमत्व विकासाचे जे अनेक कंगोरे आहेत ते अशा शिबिरांमध्ये साध्य होत नाहीत.
व्यक्तिमत्व विकास म्हणजे नोकरीसाठीच्या मुलाखतीत यश कसे प्राप्त करायचे, आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या बोलण्या किंवा वागण्यातून समोरच्या माणसावर प्रभाव कसा पाडायचा या गोष्टी प्रामुख्याने शिकवल्या जातात.
पण यातून पूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही. व्यक्तिमत्व विकास म्हणजे केवळ बाह्यविकास नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
आपल्या रोजच्या जगण्यातल्या लहान-सहान सवयी बदलून आपल्याला आपल्या व्यक्तीमत्वात अनेक बदल
Similar questions