India Languages, asked by niranjanashamkuwar25, 11 hours ago

आपण पाहिलेल्या एखाद्या गावाचे वर्णन संक्षिप्त रूपात लिहा.(l urgent it is am mark you brainly ​

Answers

Answered by pranjalsalunkhe95
2

मागील वर्षीच्या सुट्टीत आम्ही सहकुटुंब आजोळी गेलो होतो. आजोबांनी आम्हांला गव्हाचे शेत पाहायला नेले. अनेक एकर क्षेत्रावर पसरलेल्या त्या हिरव्यागार शेताच्या एका बाजूला कोवळ्या पिकाचे गालिचे पसरलेले होते, तर दुसरीकडे गव्हाच्या लोंब्यांनी भरलेली रोपे डौलात उभी होती. गव्हाच्या बाजूला एक-एक ओळ धणे लावलेले दिसते. गव्हाच्या वाढीसाठी आवश्यक नायट्रोजन मिळावा यासाठी धणे लावल्याचे आजोबांनी सांगितले. अधून-मधून पाणी शिंपणाऱ्या बारीक बारीक नळ्या गेलेल्या दिसत होत्या. सायंकाळ होत आल्याने शेतात काम करणारे लोक घरी परतत होते. त्यांच्यासोबत त्या हिरवळीचा आस्वाद घेत आम्हीही परतलो.

Similar questions
Math, 8 months ago