आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन
Answers
Answer:
Here is your answer ..
आपत्ती व्यवस्थापनामध्ये देशातील वेगवेगळ्या स्तरांवरील विविध महत्त्वाच्या संस्थांचा एकत्रित आणि परस्परसंबंधित सहभाग असावा लागतो. केंद्र आणि राज्य सरकार, जिल्हा आणि तालुका प्रशासन, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र, शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्था आणि सामान्य जनता आपत्ती व्यवस्थापनातील भागधारक म्हणता येतील.
आपत्ती व्यवस्थापन ही एका देशाची विविध विभागीय सर्वव्यापित अविरत प्रकिया आहे, ज्याअंतर्गत सर्व भागधारकांना कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी या आपत्तींना तोंड देण्यासाठी सुसज्ज असावे लागते. त्या दृष्टीने संभाव्य धोक्यांबद्दलचे विश्लेषण आणि त्यांवरील योग्य त्या उपाययोजना यांचे योग्य ते व्यवस्थापन करावे लागते. यासाठी भागधारकांमधील सर्व स्तरांवर, आपत्ती निवारीकरणासाठी लागणाऱ्या विविध संसाधनांची उपलब्धता आणि त्यांचे योग्य त्या ठिकाणी नियोजन, संचार आणि चेतावणीप्रणाली, विविध कार्यप्रणाली या सर्वांचे योग्य असे आयोजन करावे लागते.
I hope it will be help you