Aapn vachlel pustk maitrini ne vachave mahun maitrin la kalvnare patra lihine ( please give the letter
Answers
Answer:
प्रिय श्रुती,
मी काय लिहू काहीच कळत नाही आहे. आम्हाला वर्गात आमच्या बाईंनी सांगितलं कि आपण यावर्षी हा उपक्रम करणार आहोत. यामुळे तुम्हाला एक नवीन मित्र/मैत्रीण मिळेल. नवनवीन गोष्टी कळतील. पण खरं सांगू का? माझा यावर विश्वास नाही. असं पत्र लिहून मैत्री थोडीच होते? तेही एका अनोळखी व्यक्तीशी? काहीतरीच असतं बाईंचं…पण हे दिव्य करावं तर लागेलच.
मी आधी तुला माझ्याबद्दल थोडं सांगते. मी नेत्रा गाडगीळ. बालभारती विद्यालयात इयत्ता 8वी मध्ये शिकते. मला वाटतं तू पण 8वी मध्येच आहेस ना? ते तू तुझ्या पत्रात सांगशीलच म्हणा…मी पुण्यात औंधला राहते. माझ्या घरी मी, माझे आई – बाबा, आजी आणि माझा मोठा भाऊ असे पाचजण राहतो पण सध्या माझा मोठा भाऊ शिक्षणासाठी महाराष्ट्राबाहेर असतो. माझे बाबा खासगी कंपनीमध्ये नोकरी करतात आणि आई घरीच असते. ती माझ्या जन्माच्या आधी नोकरी करायची पण मी झाल्यावर तिने माझ्यासाठी नोकरी सोडली. माझ्याजवळ सतत कोणीतरी असावं असा माझ्या घरच्यांचा प्रयत्न असतो. खूप काळजी घेतात ते माझी.
माझे छंद म्हणशील तर विशेष काही नाही आहेत. मला संगीत ऐकायला व गायला आवडते. मी शास्त्रीय संगीत शिकते. शनिवारी व रविवारी माझा क्लास असतो. आई मला तिथे घेऊन जाते. तिला पण संगीताची थोडी आवड आहे म्हणून ती माझ्यातली आवड प्राणपणाने जपते. मला जुनी गाणी ऐकायला खूप आवडतात. माझ्या खोलीत गाणी सतत चालूच असतात. गाणं चालू असलं कि एकटं नाही वाटत. कोणीतरी आसपास आहे असं वाटतं.
मला अजून काय लिहू काहीच कळत नाही आहे. मी इथेच थांबते. तू तुझ्याबद्दल थोडं सांग…तुझे छंद, तुझ्या घरच्यांबद्दल वैगरे…
तुझी पत्रातील मैत्रीण
नेत्रा