World Languages, asked by harishankarreddy08, 3 months ago

आरोग्य हीच संपत्ती या विषयावर आपले विचार मांडा.

Answers

Answered by Sauron
14

उतर :

__________________

'आरोग्यम् धनसंपदा' हे बोधवाक्य पूर्वीपासून आपण ऐकत आलेलो आहोत.

या वाक्य मधूनच स्पष्ट होते की, आरोग्य धनसंपदा आहे. जीवनामध्ये धन दौलत असूनही शरीर साथ देत नसेल तर त्या संपत्ती चा उपयोग काय? आरोग्य व्यवस्थित असेल तर मनुष्य सुखी समाधानी आणि स्वस्थ राहतो.

आजकाल धकाधकीच्या युगात सर्वजण स्पर्धा करत आहेत. भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी ताणतणावाच्या चक्रव्यूहात अडकत आहे . या सर्वांमध्ये मनुष्य विसरून जात आहे पैसा सर्वस्व नसून स्वस्थ आणि निरोगी आरोग्य हे पण असणे महत्त्वाचे आहे.

स्वस्थ आरोग्य हे शारीरिक आणि मानसिक या दोन्ही प्रकारांमध्ये मोडते.

ताणतणावामुळे मानसिक आरोग्य बिघडते आणि परिणामतः शारीरीक व्याधी उत्पन्न होतात. अप्रत्यक्षरीत्या मानव प्रगतीच्या मागे पळत असताना आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. पण शारीरीक व्याधी उत्पन्न झाल्या तर कमावलेली संपत्ती गमवावी लागते.

परिणामतः असेच म्हणावे लागेल की आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे.

Similar questions
Math, 3 months ago