आरोग्य व आजार यामधील आहाराचे महत्व
Answers
Explanation:
प्रस्तावना
सुदृढ शरीरातंच निरोगी मन वास करते असे म्हणतात! अशी सुदृढ व्यक्तीही त्या देशाची संपत्ती असते. सदृढ समाजासाठी चौरस आहार, संतुलित आहाराचे महत्त्व याबाबत लोकांमध्ये सजगता असणे गरजेचं आहे, त्याचबरोबर माता आणि बालकांची घ्यावयाची काळजी याबाबत समाजामध्ये जनजागृती होणं गरजेचे आहे.
कुपोषण हे अन्न कमी पडल्याने आणि विशिष्ट अन्नघटक कमी पडल्याने देखील होते. कुपोषण काही वेळा गैरसमजुतीतूनही होत असते. माता व बालकांना योग्य आहार व त्याचे आरोग्य व पोषण याबाबत जनजागृती करण्यासाठी शासनाने राजमाता जिजाऊ, माता-बाल, आरोग्य पोषण मिशन सुरू केले आहे.
शासनाने १५ एप्रिल २०१६ ते २६ जाने २०१७ या कालावधीत पोषण चळवळ सुरू केली आहे. या पोषण चळवळीतील उपक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या दिलखुलास या कार्यक्रमात, राज्याच्या राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनच्या महासंचालक तथा प्रधानसचिव लेखा व कोषागरे वंदना कृष्णा यांना आमंत्रित करण्यात आले होते. या मुलाखतीचा थोडक्यात आढावा.
सर्वसामान्यपणे आहार व पोषणामधील अडचणी
खरं तर पोषण चळवळीचा मुख्य पाया आहे तो संतुलित आहार घेणे. आपण बऱ्याचवेळा पाहतो लोक संतुलित आहार घेत नाहीत. जाहिरातींना लोक जास्तीत जास्त आकर्षित होऊन जंक फुड अथवा फास्ट फुड खाण्यावर लोकांचा जास्त भर असतो. बहुतांशी महिलांना घरात मिळणाऱ्या दुय्यम स्थानामुळे शेवटी जेवणे, अन्न शिळे खाणे असे प्रकार होतात परिणामत: कुपोषण वाढत असते. फास्ट फुडचे जास्त सेवन केल्याने भविष्यात लठ्ठपणा, हायपरटेंशन, असे आजार होण्याची जास्त शक्यता असते तर कुपोषणामुळे बुटकेपणा, बारिक शरीरयष्टी असणारी मुलं पाहतो जी वारंवार आजारी पडतात. अशा मुलांचा शारीरिक विकास नीट न झाल्याने बौद्धीक विकासही नीट होत नाही. त्यामुळे आपण जे खातो तो आहार संतुलित असला पाहिजे याकडे लक्ष देणे गरजेचे कमी खा पण संतुलित खा असाच संदेश यामधून द्यायचा आहे.
लठ्ठपणा वाढण्याची कारणे
आपली बदललेली जीवनशैली याला कारणीभूत आहे. आजकाल आपल्याला कमी वेळात जास्त काम करायची असतात. सहाजिकच तात्काळ तयार होतील, असे पदार्थ बाजारातून खरेदी करून ते खाण्यावर भर दिला जातो. सहाजिकच जंक फूडमुळे अतिरिक्त फॅटस शरिरात तयार होतात.
पालकही मुलांना हिरव्या पालेभाज्या अथवा केळी, पपई असे पदार्थ काही वेळेस मुलाला सर्दी होईल या गैरसमजुतीतून देत नाहीत तर सातत्याने एकाच पदार्थाचे सेवन केले जाते हे टाळले पाहिजे कोणताही एक विशिष्ट पदार्थ न खाता आहारात हिरव्या पालेभाज्या डाळींचे सेवन, मासांहार योग्य प्रमाणात असावा कोणत्याही आहाराचा अतिरेक न करता चौरस आहार घेतल्यास आपणास लठ्ठपणा सारख्या समस्यापासून दूर राहता येईल.
पोषण चळवळीमधील विषयांवर भर
पोषण चळवळीमध्ये प्रत्येक घटकाची वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये गर्भवती माता, स्तनदा माता व बालक, किशोरी व कमी वजनांच्या मुलांच्या पालकांना समुपदेशनचा स्वतंत्रपणे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. गर्भवती मातांना त्यांचा आहार व गरोदरपणाच्या कालावधीत घ्यावयाची काळजी तसेच बालकाचा जन्म झाल्यानंतर घ्यावयाची काळजी, तसेच किशोरवयीन मुलींना आहाराबाबत मार्गदर्शनही या उपक्रमाअंतर्गत करण्यात येत आहे. तसेच लहान मुलांचे कुपोषण दूर