Political Science, asked by rakshe1982, 5 months ago

आर्टिक टर्न विषयी विशिष्ट माहिती लिहा​

Answers

Answered by kapilchavhan223
10

Explanation:

अख्खी पृथ्वी पादाक्रांत करायची आणि तीही एका वर्षांत इतकी हिंमत ठेवणारा हा पक्षी म्हणजे आर्क्टिक टर्न समजायला अगम्य आहे. त्याच्या आयुष्यात एकच लक्ष्य त्यांनी स्वत:समोर ठेवलेले आहे असे वाटते. उत्तर ध्रुवावरून थंडी सुरू झाली की निघायचे ते थेट दक्षिण ध्रुवाकडे. उन्हाळ्याच्या सुट्टीला जावे तसे दक्षिण ध्रुवाला पोचले, एखाद्-दुसरा महिना विश्रांती घेतली, थोडी ताकद साठवली की निघाले पुन्हा उत्तर ध्रुवावर. तिकडे उन्हाळ्याच्या सुट्टीला. अर्थात हा सर्व प्रवास ते समुद्राच्या किनाऱ्याने करत असतात. थेट समुद्रावरून नाही.

ऑगस्टमध्ये ककवरून स्थलांतराला सुरुवात करायची आणि नोव्हेंबरमध्ये अंटार्क्टिकावर पोचायचे, पुन्हा फेब्रुवारीत अंटार्क्टिका वरून आर्क्टिक इतके बळ या पक्ष्याच्या पंखात आले कोठून? त्याचे रहस्य त्याच्या पंखाच्या आकारात लपलेय.

आर्क्टिक टर्नचे पंख त्याच्या शरीराच्या मानाने लांब असतातच, शिवाय खांद्यापासून बाहेर आल्यावर आतल्या बाजूला वळून थोडा वक्राकार घेऊन पुन्हा बाहेर येतात. मग एक जबरदस्त कोन घेऊन निमुळते होत होत टोकदार होतात. या पंखांना साथ देणारा टर्नचा सडपातळ बांधा, पाय छोटे, उडताना नेहमीच शेपटीच्या आत लपलेले. त्यामुळे शेपटीचा उपयोग सुकाणूसारखा, दिशा बदलायला, कोलांटी मारायला, पाण्यात झेप घ्यायला उपयोगी. म्हणून तर एका वर्षांत १७ हजार कि.मी. अंतर येताना आणि तितकेच परतीच्या प्रवासात हा पक्षी लीलया पार करतो, असा हा आश्चर्यजनक पक्षी दोन्ही ध्रुवांच्या मध्ये उडत राहतो. त्याऐवजी वर उडत गेला असता तर चंद्रावरही जाऊन आला असता.

Hope it's helps ⚡♦️

Similar questions