Hindi, asked by tanishkaamberkar373, 10 months ago

आषाढघनाचे आगमन झाले नाही तर .....marathi essay

Answers

Answered by s10754
10

Answer:  वर्तमानपत्र  वाचत  असताना  मला  एक  गोष्ट  जाणवली  कि  प्रत्येक  दिवशी  शेतकऱ्यांच्या  आत्महत्यांच्या  बातम्या   येतात .  त्या  कशामुळे   ? माझ्या  वडिलांनी  सांगितलं  कि  ते  कर्ज  फेडू  शकत  नाही . पण  ते  हे  कर्ज  का  फेडू शकत  नाहीत ? मी  आईला  विचारले  तर  ती म्हणाली  कि  पाउस  न  पडल्यामुळे  पीक  येत नाही  मग  धान्य  बाजारात  विकू  शकत  नाही ज्यामुळे  रक्कम  मिळत नाही  आणि  कर्ज  ही  भारता येत  नाही . याचा  अर्थ  की  पाउस  माणसावर  रुसला  असेल . जर  खरच  पाउस  रुसला तर ! पाउस  पडला नाही तर आपण पिणार काय ? पाणी नसेल तर आपण स्वच्छ  कसे  होणार ? पाणी  नसेल तर पशु - पक्षी  जगणार कसे ? झाडांना  पाणी  नाही मिळालं  तर  ते   फळ   नाही  देऊ  शकणार  मग  आपण  कोणाकडे  आशेने  पाहायचे ? तो  पर्यंत  माझ्या मनात एक विचार चमकला . पाण्याच्या जागी आपण पेप्सी , स्प्राईट , को -को  कोला  असे  कॉल्ड ड्रिंक  पीऊ  शकतो . किती गंमत  ना !पेप्सीची  आंघोळ ! स्प्राईट चे  पाणी ! स्वीमिंगपूल मध्ये पाण्या ऐवोजी  को-को  कोला ! खरच  मजा  येईल  ना ! यातील  विनोद  सोडला  तर  पाण्याविना  माणसाचे  हाल -हाल  होतील . संत  तुकाराम  महाराज  म्हणतात : " वृक्षवल्ली  अम्हा  सोयरे  वनचरे  । " अर्थात  वृक्ष  आपले  सखे  आहेत . पण जर या वृक्षांना  वाढवण्यासाठी पाणीच नसले तर  काय करायचे ? मनुष्य जे  आतापर्यंत  सूर्याला  प्रणाम  करत आहेत ते  भविष्यात जाऊन  त्याला  सुर्य  नारायण  म्हणणार  का ? सूर्याच्या  उष्णतेने जमीन तप्त  होऊन  पाण्याच्या थेंबासाठी  आतूर  असेल  आणि  जे  काही  थेंब  तिला  मिळणार  ते म्हणजे  लोकांचे  अश्रुरूपी  स्वेद  असणार . पाण्याशिवाय  सृष्टी  अचल  होणार . त्यावेळेस ," लोक  पाण्यासाठी  रडणार  नाही , तर पेटणार !" पाण्यासाठी  भिक मागावी  लागेल . अश्रू येण्यासाठी  देखील  पाणी  राहणार  नाही . लोकांना  नीट  रडतही  नाही येणार . अशा  वेळी  देवाशिवाय  कोणी वाचवू  शकणार  नाही . पण त्यावेळी  देवाकडे आशेने  बघणार  का ? त्याच्यावर विश्वास  ठेवणार  का ? देव  त्यांना  मदत  करणार का ? भुकेने  कण्हणारे  लोक  आत्महत्या  हाच  पर्याय  तर नाही  स्वीकारणार  ना ? ही  सृष्ठी  कोरडी नाही राहणार  ना ?तहानलेल्या  माणसांवर  निसर्ग  दया  करणार  की  नाही ? हा  विचारच किती भयंकर  आहे ना ! आपण तर  एकदा  आंघोळ  नाही  केली  तरी किती  बेचैन  होतो . पण  जर एकदा  पाणीच  मिळायचे  बंद झाले  तर ? आंघोळ  लांब ची  गोष्ट , पाण्याच्या थेंबासाठी  तडपणार  लोकं!  खरच पाणी  माणसासाठी  अमृत  आहे . म्हणून  माणसाने  या  अमृताचा  उपयोग  योग्यपणे  करायला  हवा . आज  आपल्याला पाणी  मिळत  आहे हे  निसर्गाचे  वरदानच !

Answered by franktheruler
5

आषाढघनाचे आगमन झाले नाही तर, मराठी निबंध खालील प्रकारे लिहिला आहे.

वर्तमान पत्र वाचताना एक गोश्त गोष्ट जाणवली की प्रत्येक दिवशी शेतकरी आत्महत्या करतात. हे कशामुळे ?, माझ्या आईने सांगीतल की ते कर्ज फेडू शकत नाही म्हणून आत्महत्या करतात . अाई म्हणाली की पाऊस न पडल्यामुळे पीक येत नाही मग धान्य बाजारात विकू शकत नाही. , त्याना रकम मिळत नाही आणि ते कर्ज भरू शकत नाही. याचा अर्थ हे असेल की पाऊस आमच्याशी रुसला आहे. खरच जर पाऊस रूसला तर काय होईल?

जे पाऊस पडला नाही तर आपण स्वच्छ कसे होणार? , अाम्ही काय पिणार ? पाणी नसेल तर पशु पक्षी जगणार कसे? अाम्ही कसे जगणार? पाणी न मिळण्यामुळे झाड फळ कसे देणार ? आम्ही अशा परिस्थितित कोणाकडे पहायचे ? आमच्या कडे अश्रू येण्यासाठी देखील पाणी राहणार नाही. लोक नीट

रडू ही करू शकणार नाही. अशा स्थितित फक्त देव अाम्हाला वाचवण्यासाठी येणार .

देव भूकलेला माणसांवर दया करणार की नाही? निसर्ग तहानलेल्या माणसांवर दया करणार की नाही? हा विचार ही भयंकर आहे. आपण एक दिवशी आंघोळ केला नाही तर कस वाटतं ? अाम्ही खूप बेचैन होतात.

म्हणून पाऊस पडला नाही तर या सृष्टिचे विनाश होईल.

#SPJ2

Similar questions