( आत्म कथन )
मी पाऊस बोलतोय .................
Answers
पावसाळा किंवा पावसामुळे झालेले सृष्टीतील बदल.
उन्हाळ्यात ऊन खूप तापते . सारखा घाम येतो बाहेर फिरतानाही त्रास होतो . पावसाळ्यात मात्र हवेत गारवा यतो . सर्वांची मने शीतल होतात; म्हणून सर्वजण पावसाची वाट पाहतात.
पावसाळ्यात कधी पावसाची रिमझिम सुरू असते; तर कधी कधी तो धो धो कोसळतो. सगळीकडे पाणीच पाणी होते . नदी-नाले भरून वाहतात विहिरी-तलाव भरून जातात. सगळीकडे हिरवीगार वनश्री पसरते . शेतात पिके डोलू लागतात .वातावरण आल्हाददायक असते . सगळी सृष्टी जणू आनंदाने हसत असते .
आम्हाला पावसात खूप आनंद मिळतो . मोर रानात नृत्य करतात . बेडकांची ' डराव डराव' असा आवाज घुमू लागतो . पावसाळ्यात संध्याकाळ फारच सुंदर असते . सुर्यप्रकाशामुळे ढग रंगीबेरंगी बनतात . आकाश विविध रंगानी भरून जाते . कधी कधी आकाशात इंद्र्धनुष्यही दिसते .
असा हा पावसाळा मला हवाहवासा वाटतो
Plzz mark as brainliest
मी पाऊस बोलतोय!
मी सृष्टीला हिरवा शालू नेसवतो!
ओळखलंत मला?
होय! मी पाऊस बोलतोय. माझ्या येण्याची वाट पाहत असाल ना?
तोच पाऊस ज्याचा येण्याची तयारी तुम्ही छत्री, गमबुट घेऊन करता. जो येताना मातीचा सुगंध गेहून येतो. मी कधी कधी पूर सुद्धा आणतो सोबत पण मला खात्री आहे की तुम्ही मला पसंत करता.
उन्हाने तहानलेल्या जमिनीला येऊन मला तृप्त करायचं आहे, पण काय करू, माझे मन असूनही मी वाटेल तिथे पडू शकत नाही. मला थांबवणारे झाडे तुम्हा माणसांनी कापून टाकली आहेत. मला अडवणावरे डोंगर आता तुम्ही तोडले आहेत. म्हणून मी गरज असलेल्या ठिकाणी पडू शकत नाही.
मला जाणीव आहे की पिकांना माझी गरज आहे. काही शेतकऱ्यांचा सिंचनासाठी मीच एक आधार आहे. माझ्या न येण्याने दुष्काळही पडू शकतो. आणि माझ्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात. पण तुम्हाला काय वाटतं, कि हे सगळं मला पटतं?
नाही बरं वाटत मला सुद्धा. पण काही पर्याय नाही. जो पर्यंत तुम्ही झाडे लावत नाही, त्यांना वाढवत नाही तो पर्यंत माझे येणे कठीण आहे. माझी वाट अडवल्याशिवाय मी येणार नाही.