आत्म कथन ( मी पाऊस बोलतोय)
Answers
मी पाऊस बोलतोय
येते ना पावसाळ्याची मज्जा?
मी तुमचा आवडता पाऊस! मला खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. मी काधीचा ढगात साचून होतो. खाली अहो तेव्हा बरं वाटलं.
माझा मुले तुम्हाला खूप त्रास होत असेल ना? मला माहित आहे. पण वाक्य करू , शेतकाऱ्याला माझी गरज आहे. झाडं तहानलेली आहेत, त्यांची तहान भागवायची आहे. तुमचा वर्षभराचा पाण्याची सोय करायची आहे. किती कामं आहेत मला!
चला मी आता जातो, येईन परत थोड्या वेळाने.
छत्री घेऊन जायला विसरू नका.
■■"मी पाऊस बोलतोय"■■
नमस्कार,मित्रांनो! मी तुम्हाला सगळ्यांना आवडणारा, तुम्हाला गर्मीपासून सुटकारा देणारा 'पाऊस' बोलत आहे.
तुम्ही सगळेच आतुरतेने माझी वाट पाहत असतात. माझ्या आगमनाने तुम्हाला खूप आनंद होतो. मी आल्यावर लहान मुले तसेच मोठी माणसेसुद्धा आनंदाने नाचू लागतात. शेतकरी बांधव खूप खुश होतात.
मी घरावर,गाड्यांवर,झाडांवर,पाने व फुलांवर,तसेच निसर्गातील प्रत्येक वस्तूवर जमलेली धूळ साफ करतो आणि त्यांना चकचकीत बनवतो.
माझ्या आगमनाने झाडे फुलांनी बहरून जातात, शेतातील पीकांची वाढ होते. सगळीकडे हिरवळ दिसू लागते. मी वातावरण थंड करतो. त्यामुळे,लोकं आपल्या कुटुबांसोबत किंवा मित्र मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला पिकनिकसाठी जातात.
अशा प्रकारे, मी तुम्हाला खूप आनंद देतो आणि तुम्हाला आनंद देताना मला खूप समाधान मिळतो.
चला आता मी जातो, पुन्हा परत भेटू!