Hindi, asked by Megha2260, 4 months ago

आत्मकथा on me Shal Bolt (marathi)​

Answers

Answered by uttkarshamodshe
1

Answer:

माझ्या विद्यार्थ्यांची मी माता आहे !

माझ्या मुलांना मी नवा जन्म दिला आहे. त्यांना संस्काराचे शक्तिवर्धक दूध पाजले आहे. त्यांना ज्ञान देऊन त्यांचे पोषण केले आहे. त्यांना आयुष्यभर पुरेल 7 अशा शिक्षणाची आणि संस्कारांची शिदोरी दिली. फार काय, पण त्यांच्या कल्याणांसाठी मी माझे सर्वस्व त्यांना अर्पण केले आहे.

माझ्या कुशीतील वाचनालयात जेव्हा माझी मुले पुस्तक वाचताना दिसतात तिव्हा मला त्यांच्यात रवींद्रनाथ टागोर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब – आंबेडकर दिसू लागतात. जे मुळातच बुद्धिमान असतात त्यांच्या बुद्धीला पैलू, | पाडण्याचे काम मी निष्ठेने करत असते. इथे कुणी मुले तुकोबांच्या अभंगवाणीचा दरवळ घेतात, ज्ञानेश्वरांच्या काव्याचा आस्वाद घेतात, बालकवींच्या निरागस कुलराणीचे स्मितहास्य अनुभवतात, केशवसुतांच्या तुतारीचा आवाज ऐकतात.

ही मुले माझ्या अंगाखांदयांवर म्हणजे क्रीडांगणावर खेळत असतात. त्यांच्या विळण्याचा मला फार अभिमान वाटतो. कुणी भारतातील लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट खेळतात. एका मुलाने लागोपाठ तीन षटकार ठोकले तेव्हा मला युवराजसिंगची आठवण झाली. मला खात्री आहे की यातून पुढे सचिन तेंडूलकर निर्माण होणार आहेत. काही मुले हॉकी खेळतात. उत्तम खेळतात. मागे एकदा कधीतरी भारताने हॉकीच्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. माझी ही मुले पुन्हा एकदा ताच पराक्रम करतील आणि सुवर्णपदक खेचून आणतील, जगाचे डोळे दिपवतील अशी मला नुसतीच आशा नव्हे, तर खात्री आहे. इतर मुले आणखी काही वेगवेगळे खेळ खेळतात. ते पाहून तर असे वाटते की ते ऑलिंपिक्सचीच तयारी करत आहेत.

काही मुले विज्ञानाच्या प्रयोगशाळेत प्रयोग करण्यात गर्क झालेले दिसतात. त्यांनी आपली निष्ठा विज्ञानाला वाहिली आहे. त्यांच्या डोळ्यांपुढे जगदीशचंद्र बोस, ए.पी.जे. अब्दुल कलाम किंवा जयंत नारळीकर असू शकतील.

please mark me as brainliest...!!!!

Similar questions