आत्मकथन / आत्मवृत्तपर निबंध नमुना कृती
वर्गातील 'बाक' तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.
(१) बाकाचे आत्मकथन
Answers
Explanation:
आज वर्गात असताना खालून अचानक आवाज आला. 'काय रे ? कसा आहेस?' मला काही उमजेना. मि ईकडेतिकडे बघितला. कुणीच दिसल नाही. परत आवाज आला 'इकडेतिकडे के बघतोयस. खाली बघ. तुझा बाक बोलतोय.'
'नमस्कार, मी एक बाक. हा तोच तुम्ही वर्गात अभ्यासाला बसता तो बाक. मी आज तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल सांगणार आहे. माझा जन्म-गाव काही नाहीच. पाच वर्षापूर्वी एका सुताराने कोरलेला. तेव्हापासून या शाळेत या वर्गात कायम आहे.
अनेक असंख्य तऱ्हेची मुलं आली-गेली. काही कलाकार असत माझ्यावर सुंदर सुरेख नक्षीकाम करत, तर काही खोडकर एकमेकांची नाव लिहीत, काही नुसतीच चित्रविचित्र रेखोट्या मारत. काहीजण उगाच कसलेल्या गोष्टीचा राग माझ्यावर काढत.
आता माझ लाकूड जीर्ण झालंय. कधीही मोडेल - म्हणून शाळेने बँक बदलवायचं ठरवलंय. ते पण खरेच आहे म्हणा मुलं महत्वाचीच. परंतु या सगळ्यात माझं काय. कुठतरी टाकून दिला जाईल. असाच पडून राहिल किंवा कदाचित सरपणासाठी उपयोग होईल.
जाता-जाता तुला तुझ्या परीक्षेसाठी शुभेच्छा. चांगला पेपर लिही. आईवडिलांच नाव मोठं कर.'
आणि अचानक तो आवाज पुन्हा नाहीसा झाला. कायमचा....?
धन्यवाद...
Answer:
नेहमीप्रमाणे दुपारी तीन वाजता शाळेच्या मधली सुट्टीची घंटा वाजली आणि आम्ही सगळी मुले गोंधळ घालू लागलो. कोणी इकडे धाव तर कोणी तिकडे धाव करीत होते तर काही जण हात स्वच्छ धुवून येऊन आपापले जेवणाचे डबे काढून खाऊ लागले. मी ही डबा खाण्यापूर्वी हात धुवण्यासाठी वर्गबाहेर जाणार होतो म्हणून मी माझा डबा माझ्या दप्तरातून म्हणजेच बॅग मधून काढून माझ्या बाकावर ठेवला आणि इतक्यात आवाज आला, " थांब मित्रा! इकडे बघ. मी बाक बोलतोय! " मी दचकून आजूबाजूला पाहिले तर पुन्हा आवाज आला, "हो! खरंच मी बाक बोलतोय! आज मी तुला माझी आत्मकथा सांगू इच्छितो."
तु रोज सकाळी शाळेत येतोस आणि सर्वप्रथम या बाकावरच आपली शाळेची बॅग ठेवून लगेच आपल्या मित्रांबरोबर मजा मस्ती आणि दंगा करायला निघून जातोस बरोबर ना? परंतु तुला हे माहित आहे का की जेव्हा तु तुझी ही बॅग निश्चिन्तपणे माझ्याजवळ ठेऊन जातोस तेव्हा तिला सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर असते. तु मात्र आरामात इकडे तिकडे खेळत असतोस. पण मी सतत तुझ्या बॅगचे व त्यातील वस्तूंचे रक्षण करीत राहतो.
तुला माहिती आहे का मित्रा की, खूप वर्षांपूर्वी मी येथे या शाळेत आणला गेलो. सुंदर अश्या गुळगुळीत लाकडाने मला आकार देऊन तुम्हा विद्यार्थांसाठी बसण्यालायक बनविण्यात आले होते. त्यावेळीस माझ्यातील नविनपण सहज कोणालाही दिसण्यात येण्यासारखे होते.
सुबक, गुळगुळीत लाकडाने मला विशिष्ट अश्या आकारामध्ये बनविण्यात आले होते. तुम्हा विद्यार्थांना जितके सोईस्कर होऊ शकेल तितक्या चांगल्या पद्धतीने माझी रचना करण्यात आली आहे. जसे की तुम्हाला व्यवस्थित बसता यावे, तुम्हाला तुमच्या शाळेच्या बॅग्स आणि वह्या पुस्तके नीटनेटकी आणि सुटसुटीत ठेवता यावे व त्याचबरोबर माझ्या पृष्ठभागावर अगदी वरच्या बाजूला बारीकशी अशी एक लांब निमूळती तुमच्या पेन -पेन्सिल ठेवण्यासाठीही जागा बनविण्यात आली आहे. जेणेकरून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यास शिकत असताना आपापल्या वस्तू सोईस्कररित्या वापरता याव्यात.
तुला माहिती आहे का की, दररोज तुम्ही सर्व विद्यार्थी शाळेत येण्यापूर्वी आपल्या शाळेचे शिपाई काका आम्हा सर्व बाकांना स्वच्छ पुसून ठेवतात जेणेकरून तुम्हाला सर्व मुलांना दिवसभर याच्यावर बसायला स्वच्छ आणि नीटनीटकी जागा मिळेल.
मी जेव्हा या शाळेत नवीन आलो तेव्हा हया शाळेची बिल्डिंग नविनच तयार झाली होती. मी आणि हा फळा आम्ही एकच दिवशी या वर्गात आलो आहोत तेव्हापासूनचे आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो आहोत.
आज तु या बाकावर बसतोस पण यापूर्वीही तुझ्यासारखी कित्येक मुले या बाकावर बसली आहेत. प्रत्येक नवीन वर्षी मला तुझ्यासारखा एक नवीन छोटासा मित्र मिळतो. काही मित्र माझी काळजी घेतात तर काही मित्र मला त्रास देतात.