आत्मकथन पूर्ण करा .(निबंध)
Answers
Hope it helps you....
Please mark as brainliest....
*जुन्या घड्याळाचे आत्मकथा निबंध*
टिक टॉक टिक टॉक, ओळखलं का मला? अरे माझ्या आवाजावर नाही तुम्ही मला ओळखू नाही शकत, मी घड्याळ बोलतोय. हो बरोबर भिंतीवरचा मी घड्याळच आहे. सोनाटा या मोठ्या कंपनीमध्ये माझा जन्म झाला. माझ्यासारखे माझे अनेक भाऊ-बहिणी बनवण्यात आले. आणि मग आम्हाला विक्रेत्यांसाठी छोट्या दुकानात दिले गेले. याच दुकानातून राजू च्या वडिलांनी मला विकत घेतले. राजूचा वडिलांचा प्रिंटिंग प्रेस चा धंदा होता. त्यांच्या कारखान्यात त्यांनी मला एका भिंतीवर टांगले. माझा आकार गोलाकार होता आणि माझे अंग सोनेरी रंगाचे होते. माझ्यावर नजर टाकताच लोकांना खूप बरे वाटायचे कारण माझे रुपच खूप सुंदर होते.
राजुच्या वडिलांच्या कारखान्यांमध्ये येणाऱ्या सगळे लोक माझे कौतुक करत असत. मला पाहून ते खूप आनंदी होत. आणि मी पण माझी जबाबदारी पूर्ण करत व सगळ्यांना बरोबर वेळ नेहमीप्रमाणे दाखवत. तीन-चार महिन्यानंतर माझे सेल बदलाला लागत असत. आणि त्यानंतर मी चार महिन्यासाठी परत अविरत काम करत. राजूचे वडील देखील माझ्यामुळे नेहमी तत्पर व वेळ पाळत असे.
मला घेतल्यानंतर चार ते पाच वर्षांनंतरच माझ्या मनात भरपूर आठवणी साठल्या होत्या. आणि हळूहळू कुठच्याही मशीन सारखे मीदेखील जीर्ण होऊ लागलो होतो. एके दिवशी माझा तासाचा काटा मोडला व आत मधले गिअर तुटले. राजूच्या वडिलांनी मला रिपेअर करण्याचा निर्णय घेतला पण मी काही रिपेयर होऊ शकलो नाही. आणि त्यामुळेच माझ्या जागेवर दुसरे घड्याळ आणण्यात आले.