(२) आत्मकथन : शाळेचे मनोगत
अपघाताची खंत-
→ स्वागत
बोलक्या भिंती
शाळेचे
मनोगत
मुलांची गडबड
→ खेळाचे सामने
हिरवागार परिसर
विज्ञान प्रदर्शन
Answers
Answer:
Explanation:
नुकत्याच सुट्ट्या संपून शाळा भरली. सर्व मुले एकमेकांना सुट्टीमधील गमतीजमती सांगण्यात मग्न झाले होते.
सगळ्यांना आनंद झाला होता आणि सगळ्यांसोबत मलाही आनंद झाला होता.
मी शाळा बोलतीये. माझे नाव … आहे.
खूप दिवस माझे वर्ग बंद होते. शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलांचा गोंधळ नाही, शिक्षकांचे अमूल्य मार्गदर्शन ऐकायला मिळाले नाही, प्रार्थना नाही पूर्ण शांतता.
परंतु आता मात्र मी पूर्ण भरभरून गेले आहे. प्रार्थना ऐकून माझ्यात उत्साह निर्माण होतो.
शाळेत आल्यावर दंगा, मस्ती करणारी लहान मुले जेव्हा प्रार्थनेसाठी एकदम शिस्तीचे पालन करून प्रार्थना म्हणतात हे पाहून खूप छान वाटते.
तुमच्या अभ्यासाच्या वेळेतून तुम्ही माझ्यासाठी थोडासा वेळ काढून माझ्या अंगणातील स्वच्छता करून माझी निगा राखता हे तर माझ्यासाठी न विसरणारी गोष्ट आहे.
कचरा होऊ नये म्हणून माझ्या प्रत्येक कक्षेत कचरा पेटीचे केलेले नियोजन खूप छान आहे.
वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही यश मिळवून माझ्या काक्ष्यांमधून तसेच माझ्या परिसरामधून आनंदाने मिरवता तेव्हा मलाही तुमच्याबद्दल अभिमान वाटतो.
पावलोपावली तुम्हाला मिळणारे यश मी पाहतवार्षिक परीक्षा, चाचणी परीक्षा, शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्टही मी पाहिले आहे.
दुपारच्या सुट्टीमध्ये झाडांच्या सावलीमध्ये जेव्हा तुम्ही सर्वजण एकत्रीतपणने गप्पा मारत जेवण करता हे पाहून माझे मन भरून जाते.
महत्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याची टाकी सर्वांची तहान भागवत असते. स्वच्छतागृह असल्यामुळे स्वच्छतेचे पालन खूप चांगल्या प्रकारे होते.