आट्यापाट्या खेळाची माहिती सांगा
Answers
Answer:
आट्यापाट्या
एका संघातील खेळाडूंनी दुसऱ्या संघातील खेळाडूंना ठराविक जागेमध्ये (पाटीत) अडविणे व अडविलेल्या खेळाडूंनी हुलकावणी देऊन निसटून जाणे, अशी स्थूल रूपरेषा असलेला महाराष्ट्रीय खेळ. या मैदानी खेळात कोंडी, हुलकावणी, शिवाशिवी अशा प्रकारांचा समावेश होतो. संत तुकारामाच्या काळी हा खेळ प्रचलित होता, असे त्याच्या अभंगातील वर्णनावरून दिसते.
पूर्वी या खेळासाठी सर्वमान्य नियम नव्हते. पुण्याच्या डेक्कन जिमखान्याने हा खेळ सुधारून त्याचे १९१४ मध्ये अधिकृत व नियमबद्ध अखिल भारतीय सामने सुरू केले. १९१८ मध्ये बडोद्याच्या हिंदविजय जिमखान्यानेही सामन्यांसाठी वेगळे नियम केले. १९३५ पासून अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने या खेळाला आधुनिक, आकर्षक, संघटित व शिस्तबद्ध स्वरूप दिले. एकेरी आट्यापाट्यांची नवीन पद्धत याच मंडळाने सुरू केली. आज त्यांच्या नियमांनुसारच हा खेळ सर्वत्र खेळला जातो.
आट्यापाट्यांचे क्रीडांगण प्रचलित नियमांनुसार सूरपाटी व इतर नऊ पाट्यांत विभागलेले असते. खेळ जेथून सुरू होतो त्या पाटीला चांभारपाटी वा कपाळपाटी म्हणतात. शेवटच्या पाटीला लोणपाटी म्हणतात. सर्व पाट्यांना दुभागून जाणाऱ्या पाटीस मृदंगपाटी व सूरपाटी व त्यावरील खेळाडूस मृदंग वा सूर म्हणतात.खेळाडूंचे दोन संघ असतात व त्यांत प्रत्येकी नऊ खेळाडू असतात. अधिकृत सामन्याच्या वेळी प्रत्येकी पाटी, सूरपाटी व चांभारपाटी यांसाठी एकेक असे एकूण आठ पंच व एक सरपंच असतो. याशिवाय वेळाधिकारी व गुणलेखकही असतो.
Answer:
एका संघातील खेळाडूंनी दुसऱ्या संघातील खेळाडूंना ठराविक जागेमध्ये (पाटीत) अडविणे व अडविलेल्या खेळाडूंनी हुलकावणी देऊन निसटून जाणे, अशी स्थूल रूपरेषा असलेला महाराष्ट्रीय खेळ. या मैदानी खेळात कोंडी, हुलकावणी, शिवाशिवी अशा प्रकारांचा समावेश होतो. खेळ जेथून सुरू होतो त्या पाटीला चांभारपाटी वा कपाळपाटी म्हणतात. ...