Environmental Sciences, asked by nilimabhor8781, 2 months ago

आदी जीव कोणाला म्हणतात

Answers

Answered by rajraaz85
0

Answer:

पृथ्वीच्या उत्पत्ती नंतर तिचा पृष्ठभाग थंड झाल्यावर पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती झाली होती. शास्त्रज्ञांच्या मते जलाशयाची निर्मिती होण्यासाठी 80 कोटी वर्षे इतका कालावधी लागला.

पाण्याची निर्मिती झाल्यामुळे हळूहळू पाण्यामध्ये काही सजीवांची निर्मिती होऊ लागली. या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव निर्माण झाले.

त्यामुळे एक पेशीय सजीवांना आदी जीव असे म्हटले जाते.

आदी जीव हे आकाराने खूप लहान असल्यामुळे आपण त्यांना बघू शकत नाही. त्यांना बघण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज भासते. गोठलेल्या व समुद्राच्या पाण्यात जास्त आदी जीव असतात. आदी जीव पृथ्वीवर सर्वात आधी निर्माण झाले होते त्यामुळे त्यांना आदी जीव असे म्हणतात.

Similar questions