आदिमानव ते आधुनिक मानव यांच्या विकासातील घटना मला माहीत करुन घ्या?
Answers
Answer:
PATA NHI
Explanation:
PLEASE MARK AS BRANILST AND LIKE
Answer:
स्तनी वर्गातील नरवानर गणात आधुनिक मानवाचा समावेश होतो. नरवानर गणातील आता अस्तित्वात नसलेल्या पूर्वजांपासून आधुनिक मानवाची उत्क्रांती झाली आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या या दीर्घ प्रक्रियेला सु. ६० लाख वर्षांचा कालावधी लागलेला आहे. दोन पायांवर उभे राहून चालणे – हे मानवाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण मानले जाते आणि सु. ४० लाख वर्षांपूर्वी मानवामध्ये ते लक्षण उत्क्रांत झाले. त्यानंतर, आकारमानाने व गुंतागुंतीची संरचना असलेला मेंदू, अवजारांची निर्मिती व वापर, भाषेची क्षमता इ. इतर मानवी वैशिष्ट्ये विकसित झाली. यांखेरीज जटिल सांकेतिक अभिव्यक्ती, कला आणि सांस्कृतिक विविधता इ. प्रगत वैशिष्ट्ये मागील एक लाख वर्षांत विकसित झालेली आहेत.
नरवानर गणातील अगदी प्रारंभिक प्राण्यांपासून आधुनिक मानव (होमो सेपिएन्स) उत्क्रांत होण्याचे टप्पे यांचा बव्हंशी क्रम पुढीलप्रमाणे आहे; नरवानर गणाच्या एका टप्प्यावर होमोनायडिया अधिकुलातील प्राणी कपि (एप) उत्क्रांत झाले. पुढे या अधिकुलाच्या दोन शाखा झाल्या. त्यांपैकी एका शाखेमध्ये गिबन या एकाच प्राण्याचा समावेश होतो. त्यांना लहान कपि म्हटले जाते. दुसऱ्या शाखेच्या प्राण्यांना मोठे कपि (होमिनिडी कुल) म्हटले जाते. पुढे होमिनिडी कुलाची उपकुले झाली. त्यांपैकी अस्तित्वात असलेल्या एका उपकुलात ओरँगउटानांचा (पाँजिडी उपकुल) समावेश होतो आणि दुसऱ्या उपकुलात गोरिलीनी व होमिनीनी या दोन जमाती आहेत. गोरिलिनी जमातीत गोरिला या एकाच प्रजातीचा समावेश होतो, तर होमिनिनी जमातीत चिंपँझी (पॅन प्रजाती) आणि ज्यांना आदिमानव म्हणता येईल अशा उपजमाती येतात. या उपजमातींमध्ये सहेलँथ्रोपस, ऑस्ट्रॅलोपिथेकस, पॅरँथ्रोपस, आर्डिपिथेकस अशा विलुप्त प्रजाती आणि होमो प्रजाती येते. होमो प्रजातीत सात जाती ओळखल्या गेल्या आहेत. त्यांपैकी होमो सेपिएन्स ही जाती म्हणजेच आधुनिक मानव आहे.
Explanation:
Mark me Brainliest