) आदिवासींच्या धर्माचे तीन प्रकार नमूद करा.
Answers
Answer:
सर्वसाधारण समाजात आदिवासींबाबत भीतियुक्त औत्सुक्य असते. प्राथमिक अर्थव्यवस्था असणारे, स्त्रियांचे जबरदस्तीने अपहरण करून त्यांच्याशी पाशवी वर्तन करणारे, स्वच्छंद लैंगिक संबंध ठेवणारे, वाटेल ते भक्षण करणारे, किंबहुना नरभक्षणाचीही खंत न बाळगणारे, तसेच जादूटोण्यावर श्रद्धा ठेवणारे, उघडेनागडे लोक म्हणजे आदिवासी, असा एक समज आहे. याउलट निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या, स्वच्छंदी व स्वतंत्र वृत्तीच्या आणि आधुनिक जगाच्या संपर्कामुळे भ्रष्ट न झालेल्या आदिवासींचे जीवन सुखमय व अनुकरणीय आहे, हा विचारही विशेषतः पश्चिमी साहित्यात आग्रहाने मांडलेला आहे. काही विद्वानांच्या मते विज्ञानयुगात सभ्यतेचा प्रगतिशील विकास झाला असला, तरी त्यामुळे नैसर्गिक सुखांपासून माणसे दुरावतात. विज्ञानामुळे मिळालेल्या भौतिक सुखांपेक्षा त्यामुळे निर्माण झालेली मानसिक दुःखे अधिक आहेत. अर्थात आदिवासी जीवनाच्या सुखाची तरफदारी करणारे लोक फार थोडे आहेत.
भारतीय स्मृति-ग्रंथांत आदिवासी जमातींचा उल्लेख सापडतो. स्मृतिकारांनी त्या अनुलोम-प्रतिलोम संकरांतून निर्माण झाल्या, असे म्हटले आहे. परंतु त्यांतील शबर, रक्श, निषाद, किरात यांसारखे पुष्कळसे गट जाती नसून आदिवासी होते व त्यामुळेत्यांना हीन दर्जा प्राप्त झाला. रामायणात किरात, निषाद, शबर इ. आदिवासींचा उल्लेख आहे. बेटावर राहणारे, कच्चे मासे खाणारे व खाली मानवाचे नि वर वाघाचे शरीर असणारे, असा किरातांविषयीचा उल्लेख आहे. निषाद हे जंगलात राहणारे लोक, असा उल्लेख आहे. महाभारतात पुलिंद व किरात हे हिमालयात राहणारे आदिवासी, असा उल्लेख आहे. एकलव्याची कथा सर्वश्रुतच आहे. पुढे कलचुरी राजाविरुद्ध धिरू नावाच्या जमातीने बंड केल्याचा उल्लेख चेदी राजांच्या शिलालेखात सापडतो.भारताच्या इतिहासात आदिवासी जमाती स्थानिक राजांच्या वतीने लढल्याची अनेक उदाहरणे आहेत. शिवाजीस रामोशी व कोळी जमातींचे बरेच साहाय्य झाले. आदिवासींची पिळवणूक करणाऱ्यांविरुद्ध बरीच बंडे झाली. १७७८ ते १९४७ च्या दरम्यान आसाम, बिहार, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या राज्यांत सुमारे ७५ बंडे झाली. यांतील अधिकांश ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या विरुद्ध होती. महाराष्ट्रातही भिल्लांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता. १९५६ ते १९५८च्या दरम्यान ठाणे जिल्ह्यात वारल्यांनी जमीनदारीच्या विरुद्ध बंड पुकारले होते.
अमेरिकेच्या शोधापासून पश्चिमी लोकांची आदिवासींकडे दृष्टी वळली. अमेरिकेत वसाहत करणाऱ्यांना स्थानिक आदिवासींशी वारंवार युद्धे करावी लागली. त्यावेळी यूरोपात आदिवासींच्या स्थितीबद्दल बरीच उलटसुलट चर्चा झाली. मॉन्टेनने आदिवासी संस्कृतीत ढवळाढवळ न करण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या मते रानटी फुलांइतकेच आदिवासीही रानटी असतात.
सतराव्या शतकात आदिवासींच्या सुखमय जीवनावर आधारलेले बरेच ललित साहित्य लिहिले गेले. १६४० साली वॉल्टर हेमान्डने मादागास्कर बेटावरील लोक जगात सर्वांत जास्त सुखी आहेत, असा निर्वाळा दिला. प्रख्यात फ्रेंच लेखक रूसो याने रानटी आदिमानवाच्या स्वतंत्र रम्य जीवनासंबंधी विचार मांडले व तेव्हापासून ‘नोबल सॅव्हेज’ या संज्ञेस प्रसिद्धी मिळाली. पुढच्या शतकात कॅप्टन कुक व इतर प्रवाशांच्या प्रवासवर्णनांतून हाच सूर निघतो. कॅप्टन कुकने ऑस्ट्रेलियाचे आदिवासी यूरोपीय लोकांपेक्षा फार सुखी आहेत, असे उद्गार काढलेले आहेत.
plz mark it brainliest