History, asked by sahilshaikh917923, 1 month ago

आदिवासी व वन्य जमातीच्या उत्पन्नाची साधने

Answers

Answered by Anushka1503
45

Answer:

आदिवासीनागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मुळचे रहिवासी म्हणजे आदिवासी, असे सामान्यपणे म्हणता येईल. सर्वसाधारणपणे जंगलात, दुर्गम दऱ्याखोऱ्यांत व सुसंस्कृत समाजापासून तुटक असलेल्या प्रदेशात ते तुरळक वस्ती करून राहतात. नागर संस्कृतीचा त्याप्रमाणे वर्गश्रेणीबद्ध समाजाचा संपर्क न झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती किंवा ‘संस्कृती’ आदिवासींत आढळतात. अर्थात जगातील सर्व आदिवासी त्या त्या प्रदेशातील मूळ रहिवासी आहेतच, असे ठामपणे म्हणता येत नाही. परंतु दुसऱ्या सर्वमान्य संज्ञेच्या अभावी आदिम संस्कृतीची दर्शक अशी आदिवासी हीच संज्ञा रूढ झाली आहे. अनेक नागर संस्कृतींचे उदयास्त झाले, परंतु त्यांच्याशी संपर्क न साधल्यामुळे किंवा न आल्यामुळे आदिवासी जमाती जशाच्या तशाच राहिल्या. त्यांच्यात हजारो वर्षे विशेष परिवर्तन झाले नाही.

दक्षिण पॅसिफिक महासागरातील न्यू आयलँड बेटावरील मेलानीशियन आदिवासीचे कोरीव गणचिन्ह.

Answered by rajraaz85
0

Answer:

आदिवासी समाजाची उत्पन्नाची साधने प्राथमिक स्वरूपाची आहेत. सापळे, आकडे, पाटा-वरवंटा, जाळी, दोर्या, हातोडा कोयता, गळ, टोकदार व धारदार दांडगी, ही त्यांच्या उत्पादनाची साधने आहेत.

सर्व प्रकारची कामे ही लोक करत असतात. आदिवासी यांच्यामध्ये पैशांचे चलन नसते ते वस्तूंची देवाण-घेवाण करतात. पैशांकरिता काम करणे हा व्यवहार आदिवासी समाजात नसतो. किती वेळ काम केले आहे यावरून मोबदला ठरवला जात नाही.

आदिवासी समाजामध्ये वेळेला महत्त्व दिले जात नाही. मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आदिवासी समाजाचे व्यवहार हे चालत असतात. आदिवासी समाजाची श्रमविभागणी व्यावसायिक व सामाजिक घटकांवर अवलंबून नसते तर लिंगभेदा वर आधारित असते.

Similar questions