Math, asked by atharva9238, 4 months ago

आदर्श महिलांच्या जीवनपटावर भाषण​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

शाळेत असताना आपण कायमच 'माझा आदर्श' अशी श‌िर्षकाचा निबंध लिहीतो. पण करिअरच्या वाटेवर लागल्यानंतर मात्र खरंच आदर्श या शब्दाचा अर्थ समजू लागतो. आज प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगती करतायत. त्यामुळे महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही काही मुलग्यांना विचारलं, की त्यांना कुठल्या महिलेचा आदर्श घ्यावासा वाटतो?

गानसरस्वती

पद्मविभूषण किशोरीताई आमोणकर या माझ्या आदर्श आहेत. त्यांची संगीतातील जाण आणि सुरेल आवाज यांबद्दल तर काय बोलावं! त्यांची कला ही तर माझ्यासाठी आदर्श आहेच पण त्याही पलीकडे त्यांच्यातली माणुसकी आणि साधेपणा मला जास्त भावतो. मी एक तबला वादक आहे. किशोरीताईंनी संगीताच्या क्षेत्रात जशी उंची गाठली आहे, तशीच मलाही गाठायची आहे.

- तेजोवृष जोशी

उर्जादायी

मी टेनिसवेडा आहे. म्हणूनच माझी आदर्श आहे, व्हिक्टोरिया अझारेन्का! ऑस्ट्रेलियन ओपन्समध्ये तिने दाखवलेली खेळी वाखाणण्याजोगी आहे. टेनिस या खेळाबद्दलची तिची निष्ठा आणि प्रेम यामुळेच ती माझा आदर्श आहे. आपण ज्या क्षेत्रात असू, त्या क्षेत्राबद्दल अशीच निष्ठा असली पाहिजे, हे मी तिच्याचकडून शिकलो. लहान वयातही तिने केलेली प्रगती आणि मिळवलेलं यश मला कायमच उर्जा देतं.

- प्रीतम पाटील

सॅल्युट

माजी पोलिस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या किरण बेदी या माझ्या आदर्श आहेत. त्यांच्यातील प्रामाणिकपणा मला भावतो. त्यांनी समाजासाठी केलेलं कार्य, धडपड मला कायमच प्रेरीत करते. त्यांच्याप्रमाणे मीसुद्धा चांगलं कार्य करून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा, अशी माझी इच्छा आहे. त्याप्रमाणे मी वाटचालही करत आहे. नुसतंच भ्रष्टाचार आहे, असं म्हणत रडत बसायचं नाही. तर तो संपवण्यासाठी प्रयत्न करायचे. त्याची सुरुवात आपल्यापासूनच करायची, हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे, मी तो तंतोतंत पाळतो.

- हर्षल हर्षे

कणखर स्त्री

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी माझ्या आदर्श आहेत. त्यांचं माझ्या आयुष्यातलं स्थान अगदी आदरणीय असंच आहे. आयुष्यात कितीही संकटं आली, त्यांचा सामना कसा करावा? कणखर स्वभावामुळे त्यांनी स्वतःवरचीच नव्हे तर देशावरची संकटंही परतवून लावली. कणखरपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन हे त्यांचे गुण माझ्यातही यावेत, यासाठी मी खूप प्रयत्न करतो. कधीही आयुष्यात मनाविरुद्ध काही गोष्टी झाल्या, संकटं आली, निराश व्हायला झालं, की मी इंदिराजींचं चरित्र वाचतो.

Hope it help's you

Plz mark my Answer as Brainliest

Similar questions