आधुनिक आवर्तसारणीचा कल म्हणजे काय ?
Answers
Answer:
मेंडेलेव्ह यांनी जेंव्हा मूलद्रव्यांची आवर्त सारणी विकसित केली तेंव्हा रसायनशास्त्रज्ञांना अणूच्या अंतर्गत रचनेची काहीच माहिती नव्हती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मूलद्रव्याचा अणुक्रमांक या संकल्पनेचा उदय झाला. १९३१ मध्ये हेन्री मोज्ली यांनी दाखवून दिले की, मूलद्रव्याचा अणुक्रमांक हा अणुवस्तुमानापेक्षा जास्त मूलभूत गुणधर्म दर्शविणारा घटक आहे. मेंडेलेव्ह यांचा आवर्त सिद्धांत सुधारताना मोज्ली यांनी मूलद्रव्यांचे वर्गीकरण त्यांच्या अणुक्रमांकानुसार वाढत्या क्रमाने केले. तसेच मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुक्रमांकाचे आवर्ती कार्य आहे, असा ‘आधुनिक आवर्त सिद्धांत’ मांडला. यामुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचे भाकीत वर्तविण्यात अचूकता येऊन मेंडेलेव्ह यांच्या आवर्त सारणीतील त्रुटी दूर झाल्या. मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म त्याच्या इलेक्ट्रान संरूपणावर अवलंबून असतात म्हणूनच ठराविक अंतराने गुणधर्मांची पुनरावृत्ती होते.
मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचे असंख्य प्रकार वेळोवेळी मांडले गेले, परंतु मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची आधुनिक आवृत्ती म्हणजेच आवर्त सारणीचे दीर्घ प्रारूप (Long Form) जास्त सुलभ असून त्याचा वापर व्यापक प्रमाणात केला जातो. आज ज्ञात असलेल्या ११८ मूलद्रव्यांपैकी ९२ मूलद्रव्ये नैसर्गिक रीत्या सापडतात, तर २६ मूलद्रव्ये मानवनिर्मित आहेत. या मूलद्रव्यांची मांडणी आधुनिक आवर्त सारणीमध्ये ७ आवर्ते व १८ गट अशी केली आहे. यामुळे संपूर्ण आवर्त सारणीची विभागणी ११८ चौकोनांमध्ये झाली असून प्रत्येक मूलद्रव्यासाठी स्वतंत्र चौकोन आहे. चौकोनात वरच्या बाजूला मूलद्रव्याचा अणुक्रमांक दिसतो.
hey dude are you in 10 th class