आधुनिक काला तिल इतिहासाची साधने कोणती आहेत
Answers
Explanation:
please mark me as brainlist and say thanks
Explanation:
इतिहासाचे लेखन आणि अभ्यास हा भूतकाळासंबंधी माहिती देऊ शकणाऱ्या विविध साधनांवर अवलंबून असतो. भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाच्या अभ्यासाची साधने म्हणता येते. भूतकाळाविषयी माहिती देणारी अशी साधने विविध स्वरूपाची असतात. त्यांचे वर्गीकरण विविध निकष लावून करण्यात येते. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय व्यक्ती समाज स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घेतला जातो, ही साधने तपासून घेणे गरजेचे असते.त्याचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते.
डावीकडे, शिवछत्रपतींचे २२ सप्टें १६७८ रोजीचे पत्र, मोडी प्रत
उजवीकडे, त्याचे देवनागरी लिप्यंतर
शिवछत्रपतींचे २२ सप्टें १६७८ रोजीच्या पत्राची मूळ मोडी प्रत व त्याचे देवनागरी लिप्यंतर. मराठेशाहीच्या अभ्यासात अशी मोडी लिपीतील पत्रे प्राथमिक साधनांमध्ये मोडतात व त्यांचे अभ्यासाच्या दृष्टीने महत्व जास्त समजले जाते.