१ आधुनिक काळातील मोठी आणि बहुविधतेने भरलेली शहरे कोणत्या कारणांनी विकसित झाली ते लिहा किंवा आधुनिक काळातील शहरे कोणत्या कारणांनी विकसीत झाली. ते सविस्तर स्पष्ट करा.
Answers
Answer:
कारन त्या शहरांमध्ये मानवी जीवनसठी उपयुक्त अशा सर्व गोष्टी मिळत आहेत.
Answer:
आधुनिक काळातील विज्ञानाच्या विकासामुळे अनेक गोष्टी शहरांमध्ये उपलब्ध झाल्यामुळे शहरांचा विकास झाला .
शहरे विकसित होण्याची काही कारणे खाली दिली आहेत.
१. शहरांमध्ये उद्योग धंदे आले, कारखाने आले, विकसित तंत्रज्ञान आले.
२. शहरांमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या शाळा बांधल्या गेल्या तसेच उच्च शिक्षणासाठी विद्यालय, महाविद्यालय, विद्यापीठांची स्थापना केली गेली.
३. शहरांमध्ये दळणवळणाच्या चांगल्या सुविधा निर्माण झाल्यामुळे वाहतूक सोपी झाली.
४. वरील सर्व गोष्टी आधी शहरात आल्यामुळे गावाकडील अनेक लोक शहरांकडे स्थलांतरित होऊ लागली.
५. शहरांमध्ये जसजसे लोक संख्या वाढायला लागली तसतसे सुख-सुविधा ही वाढायला सुरवात झाली.
६. शहरांमध्ये विजेचा पुरवठा सतत चालू असल्यामुळे शहरांमध्ये सगळ्याच प्रकारच्या कामांना वेग मिळू लागतो.
७. शहरांमध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा इतर नोकऱ्यांसाठी विविध संध्या उपलब्ध होऊ लागल्या.
८. जनप्रतिनिधींचा किंवा नेत्यांचाही कल शहरांकडे जास्त असल्याकारणाने शहरे विकसित झाली.