History, asked by ashishshinde5484, 1 month ago

आधुनिक कालखंडातील टिंब टिंब लोकशाहीची चौथ्या स्तंभ आहेत

Answers

Answered by ankitabareth200787
1

लोकशाही बळकट होणे नेमके कशावर अवलंबून आहे याचे अनेक परींनी वर्णन करता येईल पण लोकशाहीत परमताविषयीची सहिष्णुता, संंयम आणि विवेक यांची नितांत आवश्यकता असते. या तीन गोष्टी कोणत्याही देशातल्या लोकशाहीचे आधार ठरत असतात. लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत. त्यातल्या कार्यपालिकेला अनेक नियमांचे बंधन असते. न्यायपालिकेला तर त्यापेक्षा कडक नियमांनी बांधलेले असते. संसद आणि जनतेेचे प्रतिनिधी मात्र याबाबत बरेच मोकळे असतात. त्यांच्यावर फार मोठी जबाबदारीही असते आणि त्यांना काही नियमांचेही बंधन असते. शेवटी ते जनतेचे प्रतिनिधी असतात आणि लोकशाहीत जनता सार्वभौम आणि सर्वोच्च असते म्हणून तिच्या या प्रतिनिधींना आपले काम करताना काही अडचणी येऊ नयेत यासाठी काही विशेष हक्कही दिलेले असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवली जाणारी पत्रकारिता मात्र फारशा नियमांनी बांधलेली नाही. खरे तर तो काही लोकशाहीचा अधिकृत आणि घटनेने नमूद केलेला स्तंभही नाही. तो स्वयंघोषित स्तंभ आहे. जनतेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि पत्रकारिता हा त्या स्वातंत्र्याच्या अभिव्यक्तीचा एक मार्ग आहे म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत जनतेेला जे अधिकार आहेत तेच पत्रकारितेचेे अधिकार आहेत आणि या स्वातंत्र्याच्या मिषाने जनतेवर ज्या कर्तव्यांचा भार पडतो तीच सारी पत्रकारितेेची कर्तव्येे आहेत. म्हणून घटनेत वृत्तपत्र स्वातंत्र्याचा निराळा उल्लेख नाही. हा स्तंभ जनतेच्या स्वातंत्र्याचा वाहक आहे म्हणून घटनेत नमूद नसतानाही जनतेने या स्तंभाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्रातल्या दोन वृत्तवाहिन्यांवर आमदारांनी हक्कभंग ठराव दाखल केला आहे. त्यामुळे पत्रकारितेत काही अंशी खळबळ माजली आहे. खरे तर आमदारांच्या विशेष हक्कांच्या भंगाला काही ठराविक नियम नाहीत. एखाद्या प्रकरणात हक्कभंग ठराव दाखल झाला आणि तो हक्कभंग समितीकडे पाठवला गेला तर ती समिती त्या प्रसंगाचा विचार करून त्या त्या स्थितीत हक्कभंंग झालाय की नाही याचा निर्णय घेते. असे असले तरी हक्कभंगाची चौकट मात्र ठरलेली आहे. हक्कभंग नेमका कशाला म्हणावे याचे काही तत्त्व आहे. आमदाराला विधिमंडळाचा सदस्य म्हणूून करणे आवश्यक असलेली कामे करताना त्या कामात कोणी अडथळा आणला तर तो हक्कभंग ठरतो. आता राज्यात तापत असलेल्या दोन प्रकरणात आमदारांच्या विशेष हक्कांच्या भंगाचा संदर्भ दोन वेळा आला आहे. एकदा मुंबईतल्या वरळी-वांद्रा पुलावर आमदाराची गाडी पकडली तेव्हा आणि नंतर त्या दोन वाहिन्यांच्या शेरेबाजीमुळे आमदार चिडले तेव्हा.

Similar questions