India Languages, asked by nikhats280, 3 months ago

aatmakathan of tree in marathi​

Answers

Answered by VarunAncharwadkar
2

Explanation:

Bhashan Marathi

मुख्यपृष्ठनिबंध Marathi essayमी झाड बोलतोय [झाडाची आत्मकथा] मराठी निबंध | Tree autobiography in marathi

मी झाड बोलतोय [झाडाची आत्मकथा] मराठी निबंध | Tree autobiography in marathi

Mohit patilडिसेंबर २४, २०२०

Zadachi atmakatha in marathi: मित्रांनो झाड हे निसर्गाने मनुष्याला दिलेले अत्यंत अनमोल उपहार आहे. परंतु वाढत्या आधुनिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे. म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा चे महत्व आपण समजायला हवे.

आजच्या या लेखात मी तुम्हाला झाडाची आत्मकथा देणार आहे या लेखात एक झाड त्याची व्यथा व त्याच्या जीवनातील आनंदाचे क्षण आपल्यासमोर मांडणार आहे.

mi zad boltoy

झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी- Zadachi atmakatha in marathi

मी एक झाड बोलतोय. मी आकाराने खूप मोठा आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी देखील आहे, माझे नेहमी आनंदी राहण्यामागील कारण असे आहे की मी लोकांना खूप लाभ पोहोचवतो. मी मनुष्याला ऑक्सिजन प्रदान करतो आणि स्वतः कार्बन डायऑक्साइड ग्रहण करतो पण तरीही कधी कधी लोक माझ्याशी छेडछाड करतात. मी शांतपणे रस्त्याच्या एका बाजूला उभा असतो, जाणारे येणारे लोक नेहमी माझ्या सावलीत विसावा घेत बसतात. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा घामाने शरीर थकते तेव्हा लोक माझ्या सावलीत येऊन बसतात.

माझ्या सावलीत बसून त्यांना आनंद मिळतो, यासाठी ते मला धन्यवाद देखील करतात. लोकांचा धन्यवाद ऐकुन मला खूप बरे वाटते. पण दुसरी कडे असाही विचार करत बसतो की, काही लोक विनाकारण माझ्या फांद्या आणि पाने तोडत असतात. काही लोक आपल्या लहानश्या स्वार्थासाठी मला नष्ट करून टाकतात. मी आज खूप मोठा होऊन गेलो आहे ज्यामुळे कोणताही मनुष्य किंवा प्राणी मला सहज नुकसान पोहचू शकत नाही.

बरेच लोक रस्त्याच्या कडेला मला पाहून माझी प्रशंसा करतात. ते म्हणतात की किती मस्त झाड आहे. काही लोक माझे फळ खाऊन त्यांची प्रशंसा करतात. काही प्राणी माझे खाली लोंबकलेल्या फांद्यांची पाने खातात, तेदेखील माझ्यासाठी चांगली प्रार्थना करतात. मी वातावरणाला प्रदूषित होण्यापासून वाचवतो. माझ्या मुळांमधील मातीला घट्ट धरून ठेवतो. माझे वय खूप जास्त असते, मी हजारो वर्षांपर्यंत एका उभा जागी राहू शकतो. परंतु मला या गोष्टीची बऱ्याचदा भीतीही वाटते. मला वाटते की जर कधी एखादा मनुष्य येऊन मला कापून घेऊन गेला तर? हा विचार करूनच माझ्या अंगावर शहारे येतात. मला नेहमी या एका गोष्टीचीच चिंता सतावत असते. कारण आजही जगात असे अनेक मनुष्य आहेत जे स्वतः च्या स्वार्थासाठी झाडांना कापून टाकतात. ते या गोष्टीचा कधीही विचार करीत नाही की मी त्यांच्यासाठी किती उपयुक्त आहे. मला नुकसान पोहचवणे म्हणजे निसर्गाला नुकसान पोहचवणे होय.

माझ्यामदतीने अनेक लोक आपली उपजीविका भागवतात. काही लोकांचे व्यवसाय ही माझ्या मुळेच सुरू आहेत. लोक माझ्या फळांना तोडून बाजारात विक्रीसाठी नेतात आणि त्यांना विकून आपला व्यवसाय चालवतात. माझ्या शरीराचा प्रत्येक भाग काही न काही कामात येतो. पक्षी माझ्या दाट फांद्यांमध्ये आपली घरटी करतात. हे पक्षी देखील माझी पाने तोडतात पण मी कोणालाच काही बोलत नाही. प्रत्येक जीवजंतू माझा उपयोग करून घेतो. पण तरीही मी प्रतिक्रिया न करता सर्व काही सहन करीत राहतो. आणि जोपर्यंत या पृथ्वीवर माझे अस्तित्व आहे तोपर्यंत मी मनुष्य आणि इतर प्राण्याची सेवा करीत राहील, जरी काही लोक मला नष्ट करून माझी लाकडे विक्रीसाठी नेत राहतील तरी मी माझे सेवा कार्य सुरू ठेवील.

समाप्त

Answered by arpitanayak292009
1

Answer:

झाडाचे आत्मवृतत

please mark me as brainlist

Attachments:
Similar questions