आवाहन करणे-. (अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
Answers
Answer:
आवाहन करणे-मदतीसाठी, सहकार्यासाठी प्रेरित करणे
राजुच्या आईला दवाखान्यात उपचारासाठी पैशाची आवश्यकता असताना सर्व विद्यार्थ्यानी शिक्षकांना आणि जनतेला मदत करण्याचे आवाहन केले
Answer:
Answer:आवाहन करणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी प्रवृत्त करणे किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी विनंती करणे.
वाक्यात उपयोग-
१. वाईट परिस्थिती असताना दिनेशने त्याच्या मित्राला मदत करण्याचे लोकांना आवाहन केले.
२. भूकंपग्रस्त भागातील लोकांचे हाल होत असताना सरकारने भूकंपग्रस्त भागातील लोकांना मदत करण्याचे जनतेला आवाहन केले.
३. ज्यावेळी लोक स्थलांतर करत होते त्या वेळेस सामान्यातील सामान्य जनतेला मदत करण्यासाठी लोक एकमेकांना आवाहन करत होते.
४. माझ्या मित्राला अचानक रक्ताची गरज पडल्यामुळे मी सर्वांना त्याला रक्त दान करण्याचे आवाहन केले.
वरील वाक्यांवरून असे दिसून येते की ज्या वेळेस आपण दुसऱ्याला एखादी गोष्ट करण्यासाठी विनंती करतो किंवा प्रवृत्त करतो त्याला आवाहन करणे असे म्हणतात.