आवडत पुरतक माहिती लिहा
Answers
Answer:
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो तुमचे स्वागत आहे आमच्या ब्लॉगवर. आज आपण माझे आवडते पुस्तक निबंध मराठी बघणार आहोत. या निबंधामध्ये लेखकाने आपल्या आवडत्या पुस्तकाचे वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
माझे आवडते पुस्तक निबंध मराठी लिहीताना आठवण येते ती उन्हाळ्याच्या सुट्टीची, दरवर्षी वर्षी सुट्टी लागली की मी माझ्या आवडत्या छंदाचे लाड पुरवून घेतो. म्हणजे मी 'ग्रंथालयाचा सभासद' होतो आणि मनसोक्तपणे पुस्तके वाचून काढतो. सुट्टीतील माझ्या या अवांतर वाचनावर कुणाचा आक्षेप नसतो.
उलट आई कौतुकाने सांगते, “आमच्या बाळ्याचा सुट्टीत काही त्रास नसतो. तो आणि त्याची पुस्तके." खरोखर पुस्तके असली की वेळ कसा जातो ते कळतही नाही. या वर्षी मी अनेक पुस्तके वाचली. या सर्व पुस्तकांत एका पुस्तकाने माझ्या मनात कायमचे स्थान मिळविले आहे. ते पुस्तक आहे गोदावरी परुळेकर यांचे 'जेव्हा माणूस जागा होतो ."
या पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला होता, म्हणून ते वाचावयाचे असे मी ठरविले होते पण ग्रंथालयात मला त्या पुस्तकासाठी क्रमांक लावून काही दिवस थांबावे लागले. जेव्हा ते पुस्तक घेऊन मी घरी