India Languages, asked by Gopal8998, 11 months ago

Aavadte preakshaniya sthal oral topic

Answers

Answered by TojoRealMadrid
1

Answer:

महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे.हे आतिशय थंड हवेचे ठिकाण आहे

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे एक नगरपालिका असणारे तालुक्याचे शहर आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर हे वसलेले शहर आहे. भारतातील जी हिरवळीने सजलेली काही मोजकीच ठिकाणे आहेत. त्यातीलच हे एक ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती, याचे क्षेत्रफळ १३७.५१ किमी.(५२.९५, स्क्वे.मीटर) आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची १३५३ मीटर(४४३९ फुट) आहे. सन २०११ चे शिरगणतीनुसार याची लोकसंख्या १२७३७ आहे.[१] येथे मराठी, हिन्दी या भाषा बोलल्या जातात. पुरुष / स्त्री प्रमाण १०/९ असे आहे. येथील साक्षरता प्रमाण ७८% आहे. ६ वर्षाखालील मुलाची ११% लोकसंख्या आहे.

Explanation:

Hope this will help you and please mark this answer as brainliest

Similar questions