२) आयुर्वेदात कोणत्या गोष्टीचा विचार केला आहे
Answers
ANSWER: आयुर्वेद हा एक संस्कृत शब्द आहे. "आयु: + वेद" असा त्याचा संधीविग्रह करता येईल किंवा "आयुषो वेद:" असा समासविग्रह करता येईल.
दोन्हीचा अर्थ साधारणपणे सारखाच होतो. आयु म्हणजे मानवी आयुष्य आणि वेद म्हणजे जाणणे. याचाच अर्थ मानवी आयुष्यात संबंधी माहिती ज्या द्वारे जाणली जाते त्या शास्त्राला आयुर्वेद असे भरता येईल.
आयुर्वेदातील सर्वात प्राचीन ग्रंथ असलेल्या चरकसंहितेत आयुर्वेदाची एक व्याख्या दिलेली आहे
हिताहितं सुखं दु:खं आयुस्तस्य हिताहितम् | मानं च तच्च यत्रोक्तमायुर्वेद: स उच्यते ||
EXPLANATION: हितायु, अहितायु, सुखायु, दुःखायु इतक्या प्रकारचे आयुष्य असते, आयुष्यासाठी हितकर म्हणजे चांगले आणि अहितकर म्हणजे वाईट, आयुष्याचे मान म्हणजे प्रमाण आणि आयुष्य (आयुष्याची सर्वांगिण माहिती) ज्या मध्ये वर्णन केलेले आहे, त्याला आयुर्वेद असे म्हणतात.
यातील हितायु म्हणजे निसर्गतः संयमित मन असल्यामुळे हितकर आहार-विहाराचे सेवन करून संयमित असलेले आयुष्य.
अहितायु म्हणजे निसर्गतः असंयमित मन असल्यामुळे सातत्याने अहितकर आहार-विहाराचे सेवन करून असंयमित असलेले आयुष्य.
सुखायु म्हणजे निसर्गतः अत्यंत उत्तम, निरोगी शरीर मिळालेले आयुष्य.
तर दुःखायु म्हणजे निसर्गतः नित्कृष्ट प्रतीचे, सतत रोग होणारे शरीर मिळालेले आयुष्य.