आयात व निर्यात मुल्य सारखेच असल्यास त्यास संतुलित व्यापार म्हणतात चुक की बरोबर ओळखा
please send answer
Answers
Answer:
एखाद्या राष्ट्राने परराष्ट्रांना पुरविलेल्या वस्तू किंवा सेवा. कोणतेही राष्ट्र बहुधा संपूर्णतः स्वयंपूर्ण नसते. प्रत्येक राष्ट्राची उत्पादक साधनसामग्री मर्यादित असते व तिचे स्वरूप अन्य राष्ट्रांच्या साधनसामग्रीहून विभिन्न असते. म्हणूनच प्रत्येक राष्ट्र केवळ स्वतःच्या साम्रगीवर संतुष्ट न राहता परराष्ट्रांशी व्यापार करून आपल्या साधनसामग्रीत भर टाकीत असते व अशा रीतीने उत्पादनात बहुविधता आणून राष्ट्रीय विकास साधण्याचा प्रयत्न करीत असते. राष्ट्रीय विकासासाठी आवश्यक असणारे घटक उदा., कच्चा माल, मध्यम माल, यंत्रसामग्री, भांडवल, श्रमकौशल्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसले, तर त्यांची परदेशांतून आयात केली जाते. शिवाय ज्या वस्तू किंवा सेवा राष्ट्रात मुळीच उपलब्ध नसतात, त्यांची अन्य राष्ट्रांतून आयात करून राष्ट्रीय उत्पादन व राहणीमान वाढविणे शक्य होते. ही आयात करता यावी व तिचे मूल्य फेडता यावे म्हणून प्रत्येक राष्ट्राला काही वस्तूंची व सेवांची निर्यात करणे आवश्यकच असते. त्याचप्रमाणे ज्या वस्तूंचे/ सेवांचे उत्पादन अंतर्गत मागणीपेक्षा अधिक असते, त्यांची निर्यात करून मिळणाऱ्या परकीय चलनाचा उपयोग स्वतःला आवश्यक असणाऱ्या वस्तूंची/सेवांची आयात करण्यासाठी करता येतो. आंतरराष्ट्रीय आर्थिक सहजीवनाचा एक मार्ग म्हणून निर्यातीचे फार महत्त्व आहे.
राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत निर्यातीचे महत्त्व निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळे असते. काही राष्ट्रे निर्यातीवर इतकी अवलंबून असतात की, त्यांच्या बाबतीत निर्यात म्हणजे राष्ट्राची आत्यंतिक गरज मानली जाते. याउलट काही राष्ट्रे इतकी समृद्ध असतात की, त्यांच्या अर्थव्यवस्थांत निर्यातीचे महत्त्व अगदीच बेताचे असते. आंतरराष्ट्रीय व्यापार जसजसा वाढत जातो, तसतशी जागतिक बाजारपेठांतील स्पर्धा वाढत जाऊन बहुतेक राष्ट्रांना निर्यातीकडे विशेष लक्ष पुरवावे लागते. शासनालाही निर्यातविषयक धोरण काळजीपूर्वक आखावे लागते व निर्यातीस प्रोत्साहन देणाऱ्या विविध मार्गांचा अवलंब करावा लागतो. निर्यातीचा परिणाम राष्ट्रांच्या व्यापारशेषावर होत असल्याने निर्यातीकडे दुर्लक्ष केल्यास व्यापारशेषात असंतुलन निर्माण होऊन अडचणी उत्पन्न होतात. निर्यात म्हणजे परकीय चलन मिळविण्याचे एक महत्त्वाचे साधन असल्यामुळे परकीय चलनाचा तुटवडा भासू नये म्हणून निर्यात वाढविणे आवश्यक ठरते.
एखादी उद्योगसंस्था जेव्हा आपला माल निर्यात करू इच्छिते, तेव्हा तिला अंतर्गत बाजारात विक्री करताना येणाऱ्या अडचणींपेक्षा कितीतरी अधिक अडचणींना तोंड द्यावे लागते. परराष्ट्रांतील भाषा, कायदे व चलनपद्धती भिन्न असतात. शिवाय परराष्ट्रीय शासनाने आयातीवर जर नियंत्रणे घातली, तर त्यांचाही विचार करावा लागतो. परराष्ट्राने आयातीवर कर बसविले असल्यास त्यांचे ओझेही निर्यातकास जाणवते. परराष्ट्रांची आयातविषयक धोरणे वारंवार व पूर्वसूचनेशिवाय बदलत असल्यामुळेही निर्यातकांना निर्यात करताना अडचणी उद्भवतात. अशा परिस्थितीत निर्यात व्यापारातील यश अनेक गोष्टींवर अवलंबून असते. एक तर, परराष्ट्रातील गिऱ्हाइकांच्या गरजा काय आहेत, त्यांना कशा प्रकारचा माल हवा आहे हे बिनचूकपणे शोधून काढावे लागते. तो माल पुरविण्याचा योग्य मार्ग कोणता हेही ठरवावे लागते. परदेशांतील उपभोक्त्यांना कोणत्या दर्जाचा माल आवडतो, त्यांच्या मालाचे प्रमाण, आवेष्टने, जाहिराती, किंमती ह्या सर्वांबद्दल काय अपेक्षा आहेत हेसुद्धा निर्यातकास विचारात घ्यावे लागते. याचाच अर्थ निर्यातकास विपणि-संशोधन करावे लागते. निर्यातीसाठी हवी असलेली बरीचशी आकडेवारी शासकीय अहवालांत मिळू शकते. काही देशांत अशी माहिती उपलब्ध करून देणारी खास ग्रंथालये, वाणिज्य मंडळे व खाजगी संस्था असतात. अशा संस्थांकडून परराष्ट्रीय बाजारांतील बदलत्या परिस्थितीचे दिग्दर्शन होऊ शकते. राजनैतिक सेवेशी संलग्न असलेले व्यापारी सहायक बहुतेक राष्ट्रांत नेमलेले असतात. त्यांच्याकडूनही परराष्ट्रीय बाजारपेठांविषयी उपयुक्त माहिती मिळू शकते. निर्यातकाला परदेशांतील गिऱ्हाइकाचे पूर्वग्रह, चालीरीती, धर्मसमजुती व स्थानिक आवडीनिवडी यांचीदेखील माहिती असावी लागते. ही माहिती स्थानिक लोकांकडून मिळवावी लागते. उदा., वेस्ट इंडीजमधील लोकांना भडक रंग फार आवडतात, हे माहीत नसल्यास सौम्य रंगाच्या वस्तू निर्यात करणारा तोट्यात येईल. चिनी लोकांमध्ये निळा व पांढरा हे रंग सुतकी मानतात. काही खुणांना विशिष्ट राष्ट्रांत विशिष्ट अर्थ असतो. उदा., भारतात लाल त्रिकोण हा कुटुंब नियोजनाची खूण म्हणून वापरतात तर चेकोस्लोव्हाकियात तो विषनिदर्शक खूण म्हणून मानतात. तुर्कस्तानात मोफत नमुना दर्शविण्यासाठी हिरवा त्रिकोण वापरतात. निर्यातकाने आपल्या मालाची परराष्ट्रांत जाहिरात व विक्री करताना तेथील वातावरणाचा आणि समजुतींचा विचार करणे आवश्यक आहे.
Answer:
इजियफ्टगबुहगझजिहफक्सक