India Languages, asked by sadansharmaipca, 7 months ago

अब्दुल कलाम यांचा जीवन विषय महत्व लिहा इन मराठी 30 से 40 लाइन ऑन मराठी​

Answers

Answered by usha1911983
5

Answer:

ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील रामेश्वरम् येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक(इंजिनिअर) होते. त्यांनी डी.आर डी.ओ. मध्ये कार्य केले व भारताच्या अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ प्रक्षेपण अस्त्रांची निर्मिती केली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते.अब्दुल कलाम यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या-आणण्याचा व्यवसाय करीत. मुलाच्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. त्या काॅलेजातून अवकाशसंशोधन(एरोनाटिक्स)चा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. , त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व DRDO चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.२००२ च्या निवडणुकीच्या निवडणुकीत ९,२२,७८४ मतदारांच्या मतांनी लक्ष्मी सहगल यांनी मिळवलेल्या १,०७,३६६ मतांना मागे टाकीत कलाम यांना राष्ट्रपती केले. कलाम भारताच्या प्रजासत्ताक देशाच्या ११व्या अध्यक्षपदावर यशस्वी ठरले [47] आणि २५ जुलै रोजी शपथ घेण्याआधी राष्ट्रपती भवनमध्ये दाखल झाले. [48] ज्यांना राष्ट्रपती बनण्यापूर्वी भारत रत्न, भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान मिळाला आहे, असे कलाम हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. यापूर्वी डॉ सर्वेपल्ली राधाकृष्णन (1 9 54) आणि डॉ. जाकिर हुसेन (1 9 63) हे आधी भारतरत्नचे लाभकर्ते होते व नंतर भारताचे राष्ट्रपती झाले. [4 9] कलाम हे राष्ट्रपती भवनवर आलेले प्रथम शास्त्रज्ञ होते. [50]

कलाम यांच्या अध्यक्ष म्हणून केलेल्या कामामुळे त्यांना पीपल्स प्रेसिडेंट म्हणतात. [51] [52] [53] त्यांनी सांगितले की, त्यांचे कार्यकालात प्रॉफिट बिल ऑफिसवर घेण्यात आलेले निर्णय सर्वात कठीण होते. [54] [55] [ 56] आपल्या कार्यकाळात tyana सादर केलेल्या २१ दया याचिकापैकी २० फेटाळून लावल्यामुळे कलाम यांच्यावर टीका झाली. कलाम यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात बलात्कार करणाऱ्या धनंजय चॅटर्जी यांच्या दयायाचिकेस नकार दिला.त्यांनी २००५ मध्ये बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. [5 9]

सप्टेंबर २००३मध्ये, पीजीआय चंदीगडमधील परस्पर संवादात, कलाम यांनी देशातील लोकसंख्या लक्षात घेऊन, भारतातील समान नागरी कायदा असण्याच्यी आवश्यकता प्रतिपादित केली. [60] [61] [62] [63]

कलाम यांचा कार्यकाळ २५ जुलै २००२पासून २५ जुलै २००७ पर्यंत झाला. [38]अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.

भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान

Similar questions