२) अभिनयाचे प्रकार स्पष्ट करा.BA/BCom
Answers
भरताने सांगितलेले अभियनाचे चार प्रकार
(१) आंगिक अभिनय - शरीर, मुख आणि हावभावांनी अर्थाची अभिव्यक्ती करणे. याचे तीन प्रकार शरीर म्हणजे शरीराच्या विविध अंगांनी केला जाणारा अभिनय. मुखज म्हणजे मुखाच्या विविध आविर्भावांनी केला जाणारा अभिनय. हावभाव म्हणजे मस्तक, कंबर, हात, वक्ष, पार्श्वभाग आणि पाय; त्याचप्रमाणे खांदे, पाठ, बाहू, डोळे, ओठ यांच्या साहाय्याने केला जाणारा अभिनय.
(२) वाचिक अभिनय - रंगमंचावरच्या नटाच्या बोलण्याच्या क्रियेचा वाचिक अभिनयात समावेश होतो. शब्दोच्चार आणि विविध ध्वनींची निर्मिती हा वाचिक अभिनय होय.
(३) सात्त्विक अभिनय स्तंभ, स्वेद, रोमांच, वेपथू, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रलय या आठ सात्त्विक भावांची अभिव्यक्ती करणारा अभिनय. ज्या पात्राची भूमिका करावयाची आहे त्याचे स्वभाववैशिष्ट्य नटाने आत्मसात केले पाहिजे आणि मन एकाग्र करून त्या पात्राशी त्याने एकरूप झाले पाहिजे; नटाने स्वत:च्या भावांचा त्याग करून पात्राच्या भावांचा स्वीकार केला पाहिजे. याप्रमाणे नट आपल्या भूमिकेशी तन्मय झाला की तो पात्राच्या भावांची अभिव्यक्ती करू शकतो. यालाच सात्त्विक अभिनय म्हणतात.
(४) आहार्य अभिनय- नेपथ्य, पोशाख, मुखसज्जा, रूपसज्जा, इत्यादींचा आहार्य अभिनयात समावेश होतो. विशिष्ट पोशाख परिधान करून मकेचा प्रेक्षकांना परिजन करून देतो. म्हणजे पात्रांच्या वेषभूषेवरून, रंगभूषेवरून ती कोणत्या भूमिका करीत आहेत, त्यांची वये काय आहेत आणि आता ती कोणत्या मानसिक व शारीरिक स्थितींत आहेत हे समजते.