Art, asked by like19, 3 months ago

३) अभ्यास प्रक्रियेशी निगडीत घटक स्पष्ट करा.BA/bcom​

Answers

Answered by likefreefire1
18

Explanation:

अभ्यासप्रक्रियेशी निगडित घटक

अभ्यासप्रक्रियेशी निगडित असलेल्या वर उल्लेख केलेल्या घटकांबद्दल आपण आता सविस्तर माहिती घेऊ या.

अभ्यासप्रक्रियेशी निगडित घटक पुढीलप्रमाणे आहेत :

(अ) मूलभूत अभ्यास-कौशल्ये,

(आ) अभ्यास-सवयी,

(इ) अभ्यासतंत्रे,

(ई) अभ्यास कार्यनीती,

(उ) अभ्यासकृतींचे अंतिम आकलन.

(अ) मूलभूत अभ्यास- -कौशल्ये

'कौशल्य' याचा अर्थ कसब, कारागिरी अथवा वाकबगारपणा होय. कौशल्य व क्षमता ह्या दोन्हींचा जवळचा संबंध आहे. क्षमता म्हणजे व्यक्तीची आंतरिक सुप्त शक्ती! ही शक्ती व्यक्तीला कार्य करण्यास प्रवृत्त करीत असते. अर्थात कौशल्य म्हणजे व्यक्तीतील व्यक्त झालेली परिपूर्ण क्षमता होय. सचिन तेंडुलकर, अझरुद्दीन, सुनील गावसकर, यांच्यासारखे क्रिकेटपटू, हुसेन चित्रकार, आर. के. लक्ष्मण, ज्ञानेश सोनार यांच्यासारखे व्यंगचित्रकार, चित्रपट/नाट्य-सृष्टीतील कलाकार हे त्या त्या कलेत कुशल असतात. एवढेच काय, सुतारकाम, गवंडीकाम, शिवणकाम, इत्यादी अनेकविध कामांतही व्यक्तीची कौशल्ये दिसून येतात. व्यक्तीचे कौशल्य हे जन्मजात नसते तर ते अविरत कष्टांतून, प्रयत्नांतून व कठोर परिश्रमांतून प्राप्त होते. या कौशल्याच्या सराव व प्रभुत्वातून पूरक उत्तम सवयी जोपासल्या जातात. एखाद्या दिवशी विद्यार्थ्याने जर अभ्यास केला नाही व त्यामुळे त्याला दिवसभर हुरहूर / अस्वस्थ वाटत राहिले तर त्याला खऱ्या अर्थाने 'अभ्यास कौशल्ये' आत्मसात झाली, असे म्हणता येईल. ह्याचे अभ्यास करणे हा त्याच्या सवयीचा एक भाग झालेला असतो.

तुम्ही या पुस्तकाबरोबरच इतरही अध्ययन-कौशल्यांची पुस्तके अभ्यासलेली आहेत. त्यांमध्ये प्रामुख्याने अध्ययनाच्या विविध तंत्रांचा वापर कसा करावा हे स्पष्ट केले आहे. ती कौशल्ये अशी

• वाचन कौशल्ये,

• लेखन कौशल्ये,

● टिपणे कशी काढावीत,

• निरीक्षण कौशल्ये.

Similar questions