Geography, asked by gulamjeelani7875, 1 year ago

अचूक पर्याय निवडा: आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात?(i) प्रावरण(ii) गाभा(iii) भूकवच(iv) खंडीय कवच

Answers

Answered by halamadrid
37

Answer:

आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला,'भूकवच' असे म्हणतात.

Explanation:

पृथ्वीचे चार थर आहेत:

१. अंतर्गाभा- हे पृथ्वीच्या सगळ्यात मध्यभागी आणि सगळ्यात उष्ण थर आहे.या थराचे तापमान ५५०० डिग्री सेल्सियस इतके असते. निकेल आणि लोह या धातूंनी हे थर बनलेले आहे.

२.बाह्यगाभा- या थराचे तापमान ४०००-५००० डिग्री सेल्सियस इतके असते.१४०० मैल जाड असलेले हे थर भूकवचच्या साधारण १८०० मैल खाली स्थित आहे.

३.प्रावरण - हे पृथ्वीचे सर्वात विस्तृत विभाग आहे.हे थर अंदाजे २९०० किमी जाड असते.प्रावरण प्रामुख्याने अर्ध वितळलेले खडक म्हणजेच मॅग्मापासून बनलेले असते.

४.भूकवच- हे पृथ्वीचे सगळ्यात बाह्य थर आहे,जिथे आपण राहतो.हे थर सुमारे ०-६० किमी इतके जाड असते.हे थर विविध प्रकारच्या अग्निज, रूपांतरित आणि गाळाचे खडकांनी बनलेले आहे.याचे दोन प्रकार आहेत:खंडीय कवच आणि महासागरीय कवच.

Answered by rravisitapure
5

Answer:

आपण पृथ्वीच्या जे थरावर रहतो त्याला खंडीय कवच असे म्हणतात

Similar questions