World Languages, asked by dksingh2110, 10 months ago

अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का ? तो प्रसंग दहा ओळीत लिहा.

Answers

Answered by rsshewalkar
9

Answer:

एकदा भरदुपारी शाळा सुटल्यावर मी व आई माझ्या मैत्रिणीच्या घरी चाललो होतो.

अचानक ऊन नाहीसे झाले आणि एक जोरदार पावसाची सर आली. आमच्याकडे छत्री नव्हतीच, त्यामुळे अचानक आलेल्या पावसात आम्ही दोघीही ओल्याचिंब झालो होतो. आडोशाला जाईपर्यंत आमचे अंगावरचे कपडे, माझे दप्तर, त्यातली वह्या-पुस्तके एवढंच काय तर मी मैत्रिणीसाठी आणलेल्या खाऊची पिशवी पूर्ण भिजली. जेव्हा आम्ही तिच्या घरी पोहोचलो, तेव्हा दोघींनाही थंडीने हुडहुडी भरली होती. रोज आठवणीने छत्री दप्तरात ठेवणाऱ्या परंतु आज छत्री घरी विसरलेल्या मला या प्रसंगामुळे चांगलाच धडा मिळाला

Answered by vennadevadiga3011
1

Answer:

एकदा ताई आणि मी बाजारात गेलो होतो. अचानक पाऊस आला. छत्र्या नव्हत्या. आम्ही झाडाखाली उभे राहीलो पण पूर्ण भिजलो होतो. रस्त्यात पाणी तुंबले होते. रिक्षा बंद झाल्या होत्या. दोघे कसेबसे घरी पोहोचलो. आईने पापड, मिरच्या वाळवण ठेवले होते. तेही भिजले. बाबांना घरी यायला खूप उशीर झाला. बाहेर वाळत घातलेले कपडेही भिजले. पावसामुळे खूप धावपळ झाली.

Please mark me as brainliest if you find this answer helpful.

Similar questions