अचानक पर्जन्य वृष्टी झाल्याने काय होईल?
Answers
Explanation:
ढगातून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात होणा-या पाण्याच्या वर्षावास वृष्टी म्हणतात.
Answer:
पर्जन्य वृष्टी -
आकाशातून जेव्हा पावसाच्या सरी बरसतात तेव्हा त्याला पाऊस किंवा पर्जन्यवृष्टी असे म्हणतात. पाऊस हा एका विशिष्ट कालावधी मध्ये पडत असतो. परंतु हवामाना मधील बदलामुळे कधीकधी अचानक पर्जन्यवृष्टी होते आणि त्यामुळे खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते.
अचानक पणे पर्जन्यवृष्टी झाल्यास शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.
पर्जन्यवृष्टी होईल याचा अंदाज नसल्यामुळे अनेक लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान होते.
खेडेगावातील लोक पाऊस पडणार नाही यामुळे घरांच्या सुरक्षेसाठी त्यांनी कुठलीही काळजी घेतलेली नसते. अचानक पाऊस झाला तर त्यांच्या घराची मोडतोड होण्याची शक्यता असते.
अचानक झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे नद्यांना पूर येतात त्यामुळे प्राण्यांचे किंवा माणसांचे जीवन धोक्यात येऊ शकते.
झाडांवरील फळांच्या व फुलांच्या देखील नुकसान होण्याची शक्यता असते.